11 April 2021 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

देशमुखांनी वाझेंना वसुलीचे आदेश दिले नसल्याचं उघड होतंय | अधिकाऱ्यांच्या कबुली जबाबात तफावत

Mumbai police officer, records statement, Parambir Singh case, Sachin Vaze

मुंबई, ७ एप्रिल: अँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थे (NIA)चा तपास सुरू आहे. बुधवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची एनआयएकडून साडेतीन तास चौकशी झाली. या प्रकरणातील कोठडीत असलेले माजी API सचिन वाझेंनाही NIA च्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी NIA ने अजून तपास करण्याचे सांगून कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आणि 9 एप्रिलपर्यंत वाझेंना NIA कस्टडीत पाठवण्यात आले. वाझेंसोबत मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले माजी काँस्टेबल विनायक शिंदे आणि गोरेला आज स्पेशल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझेंची रिपोर्टिंग थेट परमबीर सिंहांकडे होती. जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याचे प्रकरणही परमबीर सिंह यांनीहीच वाझेंना दिले होते. या कारणामुळेच परमबीर सिंह यांना एनआयएने चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणानंतर परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलिय आयुक्त पदावरुन हटवण्यात आले होते. सध्या त्यांना होमगार्ड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. सिंग यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या व्हाट्सअॅप चॅटचा पुरावाही दिला होता. त्यानंतर देशमुख यांना त्यांचं गृहमंत्रीपदही सोडावं लागलं. मात्र, प्रत्यक्षात देशमुख यांनी वाझेंना वसुलीचे आदेश दिले नसल्याची माहिती उघड झाली आहे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी पोलिसांना दिलेला कबुली जबाब प्रसार माध्यमांच्या हाती लागला आहे. या चॅटनुसार पत्रात उल्लेख असलेल्या संजय पाटील यांच्या चॅटचा मजकूर आणि प्रत्यक्ष दिलेल्या जबाबात तफावत आढळून आली आहे.

देशमुखांनी मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी 3 लाख रुपये जमा करण्यास वाझेला सांगितल्याचा चॅटमध्ये उल्लेख आहे. पण पण प्रत्यक्ष जबाबात देशमुख यांनी स्वतःहून वाझेंना त्याबाबत विचारणा केल्याचा उल्लेख असल्याचं दिसून आलं आहे. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी 3 लाख रुपये वसूल केले जात असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. ती खरी आहे का? मुंबईत असा काही प्रकार सुरू आहे का? अशी विचारणा देशमुख यांनी वाझेंना केली होती. तशी माहिती वाझेंनी मला दिली होती, असं पाटील यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ देशमुख यांनी वाझेंना पैसे जमा करण्यास किंवा वसूल करण्यास सांगितलं नव्हतं, असं स्पष्ट होत आहे. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्याच्या जबाबामुळे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh had alleged that former Home Minister Anil Deshmukh had ordered the recovery of crores of rupees from suspended Assistant Inspector of Police Sachin Waze. Singh had also given evidence of a police officer’s WhatsApp chat. After that, Deshmukh had to resign as Home Minister. However, it has been revealed that Deshmukh did not actually order Waze to recover.

News English Title: Two Mumbai police officer records statement on Parambir Singh case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(148)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x