29 September 2020 2:23 AM
अँप डाउनलोड

आरबीआय अहवाल: २०१७-१८ मध्ये भारतीय बँकांत ४१ हजार कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली : आरबीआय’ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, २०१७-१८ या वित्तीय वर्षात भारतीय बँकांमध्ये तब्बल ४१ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे ही घोटाळ्यांची प्रचंड वाढ तब्बल ७२ टक्के एवढी मोठी असल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे. सन २०१३-१४ पासून तब्बल ४ वेळी या घोटाळ्यांची आकडेवारी आणि रक्कम वाढल्याचेही अहवालतून स्पष्ट झाले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय बँकींग प्रणालीत होणारे घोटाळे ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. भारतीय बँकांमध्ये २०१७-१८ या कालावधीत विक्रमी घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले आहे. तब्बल ४२,००० कोटींचा हा घोटाळा आहे. सन २०१६-१७ मध्ये या घोटाळ्याची रक्कम २३,९३४ कोटी रुपये इतकी होती. गतवर्षी घोटाळ्याची हीच रक्कम तब्बल ७२ टक्क्यांनी वाढली आहे. सन २०१३-१४ पासून ही किंमत तब्बल ४ वेळा वाढली आहे.

आरबीआयच्या अहवालानुसार, सन २०१७-१८ मध्ये सर्वाधिक उलाढाल ही दागिन्यांमध्ये झाली आहे. पीएनबी बँकेतील घोटाळ्याचा संदर्भ देत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असल्याचे सेंट्रल बँकेने म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यातली या घोटाळ्यात तब्बल १३,००० कोटींचा अपहार झाल्याचंही राष्ट्रीयकृत बँकेने स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे, २०१७-१८ या वर्षात झालेल्या घोटाळ्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त घोटाळे हे ५० कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या रकमेचे आहेत. अनेक बँक घोटाळ्यातील आकड्यांचा विचार केल्यास २०१६-१७ मध्ये ५०७६ बँक घोटाळे झाले असून २०१७-१८ मध्ये ही संख्या ५९१७ वर पोहोचली असल्याचे आरबीआयने त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे. गतवर्षी नोंद करण्यात आलेल्या बँक घोटाळ्यांमध्ये २,००० खटले हे सायबर क्राईमशी संबंधित असून त्यांची रक्कम १०९.६ कोटी रुपये तर २०१६-१७ मध्ये ही खटल्यांची संख्या १३७२ असून घोटाळ्याची रक्कम ४२.३ कोटी रुपये एवढे होती.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1321)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x