15 May 2021 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

Budget2020 : केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray, Union Budget 2020, Nirmala Sitharaman, PM Narendra Modi

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आय.डी.बी.आय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात असे सांगून काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही काळजी वाढवणारा आहे असंही म्हटलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जुन्याच योजना, मोठ्या घोषणा आणि आकडे यांनी भरलेला हा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हेडलाईन मॅनेजमेंट करणारा आहे, सर्वसामान्यांना यातून काहीच मिळणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, “अनेक सरकारी कंपन्या विकायला काढलेल्या असताना, सरकारी तिजोरी खाली असताना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू यासारख्या धूळ’फेकू’ योजनांचा पाढा निर्मला सीतारामन यांनी वाचला. घसरणारी आकडेवारी वेगळं सूचित करत असताना, केलेल्या घोषणांवर विश्वास ठेवायचा कसा? अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे”.

यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत भाजप सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. “खरंच तो आकडा नक्की काय आहे? ते आधी बघावं लागेल. मी सकाळपासून कामात आहे. त्यामुळे तुम्ही जो आकडा सांगत आहात, तो बघावं लागेल. मी अजूनही पूर्ण बजेट बघितलेलं नाही. १५ लाख कोटी हा आकडा खरचं खोलात जाऊन बघावा लागेल,” असे रोहित पवार म्हणाले.

 

Web Title:  Chief Minister Uddhav Thackeray is not happy with the Union Budget 2020.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(378)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x