नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत परतल्यास नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, अशी घोषणा राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सत्तेत परतल्यानंतर नीती आयोगाच्या जागी अत्यंत छोटा नियोजन आयोग आणण्यात येईल. या आयोगाचे सदस्य देशाचे मोठे अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते लोक असतील. या आयोगात शंभर पेक्षाही कमी लोकांचा भरणा असेल, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Congress dissolve Niti ayog if come into rule says Rahul Gandhi