नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने कॉंग्रेस पक्षाला जोरदार डिजिटल धक्का दिला आहे. फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेली तब्बल ६८७ पेज आणि अकाऊंट्स डिलीट केली आहेत. त्यांच्या माहितीनुसार आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली सुमारे ६८७ फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
समाज माध्यमांचा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वापर मोठ्याप्रमाणावर वाढला असला तरी काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला आहे. तसेच फेसबुक देखील मॅनेज आहे का असा प्रश्न समाज माध्यमांवर नेटकरी उपस्थित करत आहेत. कारण सर्वाधिक फेक अकाउंट्स हे आजच्या घडीला सत्ताधारी भाजपच्या संबंधित असल्याचे सर्वश्रुत असताना केवळ काँग्रेस लक्ष झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		