23 May 2022 10:10 AM
अँप डाउनलोड

कोण विकत घेणार 'फ्लिपकार्ट' ?

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी ई – कॉमर्स क्षेत्रातील ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन शॉपिंग कंपनीची लवकरच विक्री होण्याची शक्यता आहे. जगातील दोन मोठ्या कंपन्या ‘फ्लिपकार्ट’ला विकत घेण्यास उत्सुक असल्याचे समजते.

फ्लिपकार्ट’च्या कंपनीच्या दोन मुख्य स्पर्धकांनीच फ्लिपकार्टला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फ्लिपकार्ट ज्यांच्या ताब्यात जाईल त्या कंपनीची बाजारातील एकूण ताकद प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.

‘मिंट’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे, भारतीय कंपनी फ्लिपकार्ट’ला विकत घेण्यासाठी अमेरिकन कंपनी अमेझॉनने प्रचंड उत्सुकता दाखवली आहे. तसेच अमेरिकेतील दुसरी महाकाय रिटेल कंपनी ‘वॉलमार्ट’ सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाली आहे.

वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील जास्तीत जास्त भाग विकत घेण्यास उत्सुक आहे तर अमेझॉनने पूर्ण कंपनीच विकत घेण्यासाठीच ऑफर देण्याची तयारी चालू केली आहे. वॉलमार्ट ‘फ्लिपकार्ट’ मधील ४० टक्के हिस्सा विकत घेण्याच्या तयारीत आहे. त्यांना प्रायमरी आणि सेकंडरी समभाग खरेदी करत मोठी भागीदारी हवी आहे. सध्या फ्लिपकार्टच बाजार मूल्य २१ अरब डॉलरच्या आसपास आहे.

हॅशटॅग्स

#Flipkart(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x