27 June 2022 1:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल
x

अजित पवार म्हणजे शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद : शिवसेना

मुंबई : कोल्हापुरातील हल्लाबोल सभेत शिवसेनेला गांडूळाची उपमा देणाऱ्या अजित पवारांवर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सडकून टीका केली आहे. सामनात टीका करताना शिवसेनेने म्हटले आहे की, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत केवळ सत्तेच्या खुर्च्या उबवून स्वहित पाहणाऱ्या अजित पवारांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अजित पवारांना राजकारणात जे काही मिळालं आहे ते केवळ शरद पवारांच्या कृपेमुळे मिळालं आहे. पण स्वतःच नैतृत्व अजित पवारांना उभे करताच आलं नाही. अजित पवारांची जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे आणि ते केवळ येणाऱ्या जाणार्यांवर त्यांच्या त्याच तोंडाने थुंकून ते घाण करत असतात. अजित पवारांच्या त्याच तोंडामुळे शरद पवारांनी जे आयुष्यभर कमावलं ते अजित पवारांच्या तोंडामुळे अल्पावधीतच धुळीला मिळालं. इतकंच नाही तर अजित पवार म्हणजे दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहेत काय, असा बोचरा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांची काहीच पत राहिलेली नाही, परंतु त्यांच्या जिभेचा गांडूळ अधूनमधून वळवळत असतो. मागच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जाणकारांनी अजित पवारांना जवळ जवळ पराभूत केलं होत. त्यामुळे अजित पवारांचं राजकारण बारामतीपुरते सुद्धा उरले नसल्याची टीका करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुद्धा सत्ता धुळीला मिळाली असून राज्याच्या विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे विरोधी पक्ष पद सुद्धा राहिलेलं नाही. राष्ट्रवादी पक्षाचा जीर्ण सांगाडा झाला आहे तरी सुद्धा ‘हल्लाबोल’ यात्रेच्या नावाखाली हेच सांगाडे उसने अवसान आणत आहेत अशी बोचरी टीका केली आहे.

वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा अजित पवारांच्या निष्क्रियतेमुळे पक्षबांधणीसाठी शरद पवारांना वणवण करावी लागत आहे. अजित पवार शिवसेनेला गांडूळ बोलतात पण गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. पण सत्तेत राहून अजित पवारांनी जमीन घोटाळे आणि पाणी घोटाळ्यांशिवाय दुसरं केलं काय असा घणाघात सुद्धा अजित पवारांवर केला आहे. भुजबळांबरोबर तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळेच अजित पवार हे भाजपचे बूट चाटत शिवसेनेवर हल्ला करत असल्याच्या आरोपही केला आहे.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(185)#Shivsena(1154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x