पुढील ३ महिने शिवभोजन थाळी १० वरुन ५ रुपयांवर, मंत्रिमंडळ बैठकीतील ९ निर्णय
मुंबई, ८ जुलै : महाविकास आघाडी प्रणित ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना आणि अनलॉकिंगच्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 9 निर्णय घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे आणखी तीन महिने शिवभोजन थाळीची किंमत 10रुपयांवरुन 5 रुपयांवर करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी अवघ्या 5 रुपयांत मिळणार आहे.
यापूर्वी मार्च महिन्यात तीन महिन्यांसाठी या थाळीची किंमत 10 वरुन 5 करण्यात आली होती. ती सुविधा आता आणखी तीन महिन्यांसाठी लागू असेल. मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को.ऑप.सोसायटी लि.यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाडयाच्या दराबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम २६, १४८-अ मध्ये सुधारणा अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
जल जीवन मिशनलाही सुरुवात करण्यात येणार असून राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीत उत्पादित झालेल्या अतिरिक्त दूधाच्या नियोजनाच्या योजनेस मुदतवाढीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे ”आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,” असे नामकरण करण्यात आले आहे. आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को.ऑप.सोसायटी लि.यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाडयाच्या दराबाबत निर्णय.
- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम २६, १४८-अ मध्ये सुधारणा अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता.
- जल जीवन मिशन.
- राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दूधाच्या नियोजनाच्या योजनेस मुदतवाढीचा निर्णय.
- कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे ” आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,” असे नामकरण.
- आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास परवानगी
- शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी 5 रुपये एवढा करणे
- एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देणार
- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा 2 राज्यात राबविणे
News English Summary: Mahavikas Aghadi Pranit Thackeray’s government has increased the price of Shivbhojan Thali from Rs 10 to Rs 5 for another three months in the cabinet meeting today. For the next three months, Shiv Bhojan Thali will be available for just 5 rupees.
News English Title: Mahavikas Aghadi Shivbhojan Thali next 3 months rupees 5 only decisions cabinet meeting News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा