मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर १ एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात तब्बल सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे विजबिलात सहा टक्क्यांनी वाढ होईल आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसेल.
राज्य वीज आयोगाने गेल्या वर्षी १२ सप्टेंबरला राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले. महावितरणला ८२६८ कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
