2 May 2025 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

फेसबुकनंतर गुगल Jio App Platform मध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत

Google, Facebook, Jio Platform, Mukesh Ambani

नवी दिल्ली, १४ जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी काल मोठी आनंदाची बातमी दिली. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी आज ही मोठी घोषणा केली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल.

“आम्ही गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असं ट्विट पिचई यांनी केलं होते.

दरम्यान, गुगल कंपनीचा गुगल फॉर इंडिया हा व्यावसायिक प्रकल्प असून त्या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितले की, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गुगलने या देशात इतकी मोठी गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाबद्दलच्या धोरणामुळे गुगल कंपनीला मोठे पाठबळ मिळाले आहे. सुंदर पिचाई हे भारतवंशीय असून गुगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या सीइओपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीने देशात सर्वांनाच अभिमान वाटला होता.

इकॉनॉमिक्स टाइम्सशी बोलताना पिचई यांना जिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणुकीसंदर्भात विचारणा केली, त्यावेळी पिचई यांनी होकार दिला नाही, पण नकारही दिला नाही. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानींची कंपनी जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुगलकडून ४ अब्ज डॉलर म्हणजे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीची शक्यता आहे. याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. गुगलने आत्तापर्यंत १.१८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून जिओच्या गुंतवणुकीवर अखेरचं शिक्कामोर्तब झाल्यास, फेसबुकनंतर गुगलच सर्वाधिक भागिदारी असलेली कंपनी ठरणार आहे. फेसबुकने जिओसोबत ९.९९ टक्क्यांची भागिदारी म्हणून ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आत्तापर्यंत जिओची भागिदारी विकून तब्बल 1.18 लाख कोटी रुपये कमावले आहेत.

 

News English Summary: Google is expected to invest 4 billion, or Rs 30,000 crore, in Mukesh Ambani’s company Geo’s platform. Negotiations are in the final stages.

News English Title: Google also invests billions in Reliance Jio negotiations in final stages News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JIO(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या