3 May 2025 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

कोरोना लाटेत गंगा घाटावरील वास्तव देशासमोर आणणाऱ्या दैनिक भास्कर समूहावर इन्कम टॅक्सची विभागाची धाड

Dainik Bhaskar Group

भोपाळ, 22 जुलै | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातील वास्तव आणि गंगा घाटावरील गाडलेल्या मृतांच्या संबधित स्पॉट रिपोर्टींग केल्यानंतर देश आणि जगभर मोदी सरकारच भांड फुटलं होतं. मात्र त्या धाडसी रिपोर्टींगची सुरुवात केली होती उत्तरेकडील प्रमुख वृत्तपत्र समूह दैनिक भास्करने हे देखील देशाला पाहायला मिळालं होतं. मात्र त्याच समूहावर उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीपूर्वी दबाव टाकला जातं आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.

कारण, योगी सरकार आणि मोदी सरकारचं कोरोना आपत्तीतील वास्तव जगासमोर मांडणाऱ्या दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या विविध कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापेमारी केली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. या कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. दैनिक भास्कर समूह हा देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक आहे.

कर चोरी प्रकरणात आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाचाच महत्त्वाचा भाग असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापेमारी केली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Income Tax Department raids on Dainik Bhaskar Group in Madhya Pradesh news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या