सांगली: प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समुहाचे काकासाहेब चितळे उर्फ दत्तात्रय भास्कर चितळे यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. मिरज येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. चितळे उद्योग समूहाचे आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती.
चितळे डेअरी म्हटलं की श्रीखंड आणि बाकरवडी हे दोन पदार्थ समोर येतातच. पुण्यात चितळे डेअरीची अनेक उत्पादनं प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्येही चितळे डेअरीजचे पदार्थ मिळतात. दुधाच्या व्यवसायापासून सुरु झालेल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यात काकासाहेब आणि नानासाहेब चितळे यांनी चांगलीच वाढवली.
सुप्रसिद्ध चितळे डेअरी ही दुग्धोत्पादक संस्था सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी गावात १९३९ मध्ये सुरू झाली. भास्कर चितळे यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्यासोबतीला दुसऱ्या पिढीतीले भाऊसाहेब व काकासाहेब चितळे यांनी हा व्यवसाय आणखी वृ्द्धीगंत केला. भाऊसाहेब चितळे यांनी १९५० मध्ये चितळे बंधू मिठाईवाले या कंपनीची स्थापना केली.
भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे गेल्या २७ वर्षांपासून अध्यक्ष, भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त व संचालक, मुंबई माताबाल संगोपन केंद्राचे आश्रयदाते, विवेकानंद नेत्र चिकित्सालय, लायन्स नॅबचे आश्रयदाते अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, नेत्रदान, रक्तदान, औद्योगिक चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या दुग्ध उद्योग क्षेत्रासह कृष्णाकाठ परिसरावर शोककळा पसरली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काकासाहेब चितळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काकासाहेब चितळे यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर दुग्ध उत्पादन कसे वाढेल तसेच चांगल्या गाई व म्हशींच्या प्रजाती कशा निर्माण होतील यासाठी संशोधनावर भर दिला. pic.twitter.com/JjCJFLx3ne
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 8, 2020
Web Title: Industrialist and Chitale group director Kakasaheb Chitale passes away.
