25 September 2020 10:56 PM
अँप डाउनलोड

पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार; सोशल मीडियावरील कमेंटचा आधार

Sharad Pawar murder plan, Cyber Police Pune

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकार भाऊ तोरसेकर आणि ‘पोस्टमन’ या पोर्टलवर कमेंट करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली. काही वेबपोर्टलवरुन शरद पवार यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषणांचे व्हिडीओ टाकले जात आहेत. त्याखाली शरद पवार यांच्याविरोधात टोकाच्या कमेंट केल्या जात आहेत. या कमेंटवरुन शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप लक्ष्मीकांत खांबिया यांनी केला आहे.

निवडणुकांच्या काळात आणि गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करून सामाजिक व राजकीय ऐक्याला तडा जाईल, असे कृत्य करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाऊ तोरसेकर, घनशाम पाटील आणि इतर लोकांकडून युट्यूबवर पोस्टमन थींक टॅंक इत्यादी चॅनेलच्या माध्यमातून शरद पवार यांना संपविले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशा आशयाची भाषणे होत आहेत. हे चिथावणीखोर वक्तव्ये माझ्या निदर्शनास आल्यामुळे ही तक्रार दाखल करत असल्याचं खाबिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. खाबिया हे पुण्यातील शिवाजी नगर भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, पुणे सायबर पोलीस विभागाने त्यांच्या तक्रारीची नोंद करुन घेतली आहे.

पत्रकार भाऊ तोरसेकर आणि पोस्टमन या युट्युब चॅनेलवर कमेंट करणाऱ्यांविरोधात लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच, कोरेगाव भिमा दंगलीचे खरे सुत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित करत, हे प्रकरण गंभीर असल्याचंही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या खाबिया यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

Web Title:  NCP President Sharad Pawar murder plan someone complaint lodged at Cyber Police Pune.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x