19 July 2019 9:50 AM
अँप डाउनलोड

छत्रपती शिवाजी महाराज फेम अमोल कोल्हे यांच्या भाषणाला नरेंद्र मोदींनी दिली दाद

छत्रपती शिवाजी महाराज फेम अमोल कोल्हे यांच्या भाषणाला नरेंद्र मोदींनी दिली दाद

शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांना पराभूत करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या शिरूर मतदार संघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजी फेम अमोल कोल्हे यांचा उल्लेख करत नरेंद्र मोदींनी त्याच्या लोकसभेतील पहिल्या आकर्षित भाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण हे अभ्यासपूर्ण होते आणि काही निवडक खासदारांनी देशासमोरील समस्या व उपयोजना मांडणाऱ्या खासदारांमध्ये महाराष्ट्राचे डॉ. अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदार डाॅ. हिना गावित आणि डाॅ. अमोल कोल्हे यांचा आवर्जून उल्लेख केला. कोल्हे यांच्या पहिल्याच भाषणाची त्यामुळे सर्वत्र चर्चा झाली.

अमोल कोल्हे यांनी केलेल्या त्यांच्या पहिल्याच भाषणात “सत्ता संचालनासाठी विरोधी पक्ष आणि स्वायत्त संस्था” आवश्यक असल्याचे सांगितले. “सीबीआय, “रिझर्व बँक, न्यायपालिकेची” स्वायत्तता टिकून राहावी आणि शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा परंतु स्मशान होऊ नये. अशा शब्दात त्यांनी एक प्रकारे भाजप सरकारकडून स्वायत्त संस्थांवर होणाऱ्या कुरघोडीचे वाभाडेच काडले असावेत.

जेव्हा भारतावर मुघलांचं राज्य होतं, तेव्हा स्वराज्य स्थापन करत पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं म्हणजेच लोकांचं राज्य निर्माण केलं. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हि आमची संपत्ती, त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन आपण केलं पाहिजे. तसेच १७ व्या शतकात किल्ले रायगड हि स्वराज्याची राजधानी होती. त्या राजधानीला १७ व्या शतकातील वैभव प्राप्त करून द्यावे, जसा रायगड १७ व्या शतकात होता तसाच रायगड आत्ता उभारावा म्हणजे तो जगातील ८ वा अजुबा असेल.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#DrAmolKolhe(1)#NCP(125)BJP(409)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या