12 May 2025 9:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

धक्का! इन्फोसिसमधील १२ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

Infosys, TCS, Wipro

बेंगळुरूः आयटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या कॉग्निझंटने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आता इन्फोसिसनेही त्याच दिशेने पाऊल टाकले आहे. इन्फोसिस मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कॉग्निझंटने कर्मचारी कपातीसाठी जो मार्ग अवलंबला आहे तशाच प्रकारे इन्फोसिसही कपात करणार आहे. वरिष्ठ आणि मधल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढणार आहे. यानुसार इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

या विभागात सर्वाधिक भरमसाट पगार असलेले कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीजवळ आतापर्यंत ३०९२ कर्मचारी जेएल ६, जेएल ७ आणि जेएल ८ विभागामध्ये कार्यरत आहेत. कंपनी जेएल ३, जेएल ४ आणि जेएल ५ विभागातल्या दोन ते पाच टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. अशा प्रकारे कंपनी जवळपास ४,००० ते १०,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. तसेच या तिमाहीत कंपनी १२,२०० कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.

तत्पूर्वी, देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप लावल्यानंतर त्यांचे शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांचं काही मिनिटांत ४५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. रिपोर्टनुसार, इन्फोसिसने नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी अनैतिक पावलं उचलली आहेत. या प्रकरणी एका ग्रुपनं इन्फोसिस बोर्डाला पत्र लिहून माहिती दिली आहे.

मागील आठवड्यात तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या कंपनीच्या ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगविण्यात आली असल्याचा आरोप इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याने केला होता. कंपनीच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या चार पानी पत्रात संबंधित कर्मचाऱ्याने आपले नाव जाहीर न करता आर्थिक ताळेबंदाच्या गैर व्यवहाराचा आरोप केला आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून त्यातील नफ्याची आकडेवारी ही खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने याबाबतच्या पत्रात केला आहे.

इन्फोसिसबाबतीत व्हिसलब्लोअर्सने कंपनीच्या बोर्डाला या प्रकरणात एक पत्र २० सप्टेंबरला लिहिलं होतं. पत्रात लिहिलं होतं की, इन्फोसिस स्वतःचा नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत आहे. कंपनीचे सध्याचे सीईओ सलील पारेखही यांचाही यात सहभाग आहे. तर दुसरं एक पत्र २७ सप्टेंबरला अमेरिकी शेअर बाजार रेग्युलेटर यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनलाही देण्यात आलं आहे. खरं तर इन्फोसिसचा एडीआर हा न्यूयॉर्क एक्स्चेंजमध्येही आहे. सोमवारी ADR १२ टक्क्यांहून खाली घसरला होता. त्यामुळेच इन्फोसिसचे शेअर्स १५ टक्क्यांनी अधिकनं पडले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या