13 November 2019 11:50 PM
अँप डाउनलोड

सामान्यांचे भर दिवाळीत बुरे दिन! गॅस सिलिंडर महागले

नवी दिल्ली : संपूर्ण देशात विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल साठ रुपयांची तर अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये २.९४ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे भर दिवाळीत घरात फराळ बनवताना सुद्धा दहावेळा विचार करावा लागणार आहे. आधीच प्रचंड महागाईने हैराण झालेल्या सामान्य माणसाचा एकही सण आनंदात जाण्याची चिन्ह दिसत नाहीत. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात सुद्धा तब्बल ५९ रुपयांची वाढ झाली होती. जून महिन्यापासून गॅस दरांमध्ये झालेली हा सलग ७ वी वाढ आहे.

त्यामुळे नव्या दरांप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलिंडरचे दर ८८० रुपये इतके असेल. विशेष म्हणजे अनुदानित सिलिंडरवर देण्यात येणारी सूट मोदी सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांच्या खात्यात ४३३.६६ रुपये जमा होतील. तर ऑक्टोबर २०१८ मध्ये ही रक्कम ३७६.८० पैसे इतकी होती.

इंडियन ऑइलने सप्टेंबर महिन्यातच एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढल्यामुळे आणि विदेशी मुद्रा विनिमय दरातील चढ-उतार हे गॅस सिलिंडरच्या दर वाढीस कारणीभूत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1036)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या