मुंबई, ३० जून | बँकिंगच्या अनेक नियमांमध्ये १ जुलैपासून अनेक बदल होत आहेत. यात सर्वाधिक खातेदार असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे नियम महत्त्वाचे आहेत. बँक आता महिन्यात चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास शुल्क वसूल करणार आहे. तसेच व्यावसायिकांसाठी टीडीएस नियमांतही बदल लागू होतील. दर महिन्याप्रमाणेच १ जुलैपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होतील.
एसबीआयतून एक महिन्यात चार वेळा पैसे काढणे :
एसबीआयची शाखा असो की एटीएम आता महिन्यात केवळ ४ वेळाच रोकड काढता येईल. त्यानंतर प्रत्येक वेळी १५ रुपये आणि जीएसटी शुल्क बँक तुमच्या खात्यातून कापेल. १० पानांचे मोफत भेटणारे चेकबुक आता मोफत भेटणार नाही. बँक यासाठी ४० रुपये शुल्क आणि जीएसटी वसूल करेल. तत्काळ चेकबुक घेतले तर ५० रुपये लागतील. जर चेकबुकद्वारे होम ब्रँचमधूनच पैसे काढले तर त्यांना शुल्कातून सूट दिली जाईल. हा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू नसेल. त्यांना आधी सारखेच चेकबुक मोफत मिळेल. सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलिनीकरण झाले आहे. म्हणून त्यांचा आयएफएससी कोडही १ जुलैपासून बदलत आहे. तसेच कॉर्पोरेशन आणि आंध्र बँकांचे युनियन बँकेत विलिनीकरण झाले आहे. आता या बँकांचे जुने चेकबुक काम करणार नाही. खातेदारांना नवे चेकबुक घ्यावे लागेल. नवीन आयएफएससी कोड वापरावा लागेल.
प्राप्तिकर- ५० लाखांपेक्षा जास्तीच्या व्यावसायिक खरेदीवर टीडीएस कापला जाईल:
प्राप्तिकर अधिनियमात नुकतेच सेक्शन- १९४ जोडण्यात आले आहे. हे सेक्शन एखादे साहित्य खरेदी करण्यासाठी आधीपासून निश्चित किमतीवर लागणाऱ्या टीडीएसशी संबंधित आहे. नव्या सेक्शन अंतर्गत ५० लाख रुपयांवरील व्यावसायिक खरेदीवर ०.१० टक्के टीडीएस कापला जाईल. जर गेल्या वर्षी एखाद्या व्यावसायिकाची उलाढाल १० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर या वर्षी तो ५० लाखांपेक्षा जास्तीचे साहित्य घेऊ शकतो. त्यापेक्षा जास्तीच्या विक्रीवर टीडीएस कापला जाईल. १ जुलैपासून २०६ एबी सेक्शनची अंमलबजावणी होईल. या अंतर्गत जर विक्रेत्याने दोन वर्षांपर्यंत प्राप्तिकर परतावा दाखल केला नाही तर हा टीडीएस ५ टक्के होईल. म्हणजे आधी जो टीडीएस फक्त ०.१० टक्के होता, तो पाच टक्के होण्याचा अर्थ टीडीएसचे प्रमाण ५० पट वाढेल. जर मागील आर्थिक वर्षात टीसीएस ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास तरीही टीडीएस कपात ५ टक्के दराने केली जाईल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: New rules from 1 July 2021 withdrawals more than 4 times will be charged by SBI news updates.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		