19 April 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Viral Video | खतरनाक! जोसेफने जोरदार बाऊन्सर टाकला, पण सूर्यकुमारने मारलेला अप्पर कट तुफान व्हायरल

Viral Video

Viral Video | भारतीय संघाला मिळालेल्या या विजयात सूर्यकुमार यादव याचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. कर्णधार रोहित शर्मासोबत सूर्यकुमारने या सामन्यात डावाची सुरुवात केली. त्याने ४४ चेंडू खेळले आणि ताबडतोड ७६ धावा कुटल्या. यामध्ये त्याच्या ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १७२ पेक्षा जास्त होता.

रोहित शर्मा संघाची धावसंख्या १९ असताना रिटायर्ड हर्ट झाला. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारच्या टी-२० कारकिर्दीतील हे ५ वे अर्धशतक होते. संघाची धावसंख्या १३५ असताना सूर्यकुमार बाद झाला.

बाऊन्सर टाकला आणि :
भारत आणि वेस्ट इंडिज टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव 61 धावांवर खेळत होता. त्यावेळी सामन्यात 10 वं षटक सुरु होतं. त्याचवेळी सूर्यकुमार यादवच्या चेहऱ्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. अल्जारी जोसेफ 10 वी ओव्हर टाकत होता. त्याने या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाऊन्सर टाकला. हा चेंडू थेट सूर्यकुमारच्या चेहऱ्यावर आदळला असता, पण आधीच त्याने तो चेंडू हेरला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video WI Vs IND 3rd T20 Suryakumar Yadav upper cut hit against Alzarri Joseph bouncer gone viral on social media 03 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x