3 December 2024 7:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | आता प्रत्येक महिला व्याजाने कमवेल 30000; जाणून घ्या पोस्टाच्या योजनेची फायद्याची गोष्ट - Marathi News Mutual Fund SIP | पैशाचे पैसा वाढवा, बचत फक्त 167 रुपये, पण परतावा मिळेल 5 कोटी रुपये, जाणून घ्या अनोखा फंडा - Marathi News Waaree Renewables Share Price | 49,968% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - SGX Nifty Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty Vedanta Share Price | वेंदाता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, संधी सोडू नका - SGX Nifty Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News Home Loan | गृहकर्जावर बँक वसूलते एकूण 6 प्रकारचे चार्जेस; पहिल्यांदाच लोन घेणाऱ्यांना हे माहित असणे गरजेचे आहे
x

Elliot Alderson: आरोग्य सेतू अ‍ॅप सुरक्षित, भारत सरकारच्या दाव्यावर हॅकर म्हणाला, उद्या भेटू!

Covid 19, Corona Crisis, Aarogya Setu App, French hacker

नवी दिल्ली, ६ मे : कोरोनासंदर्भातील सर्व माहिती देणारे आरोग्य सेतू अ‍ॅप सुरक्षित असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. एका फ्रेन्च हॅकरने (Elliot Alderson) मंगळवारी ‘९ कोटी भारतीयांची माहिती उघड होण्याचा धोका आहे,’ असं ट्विट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. “या अ‍ॅपवरील माहितीची चोरी किंवा सुरक्षेसंदर्भात कोणताही गोंधळ झालेला नाहीय. तसेच या हॅकर्सने या अ‍ॅपवरुन खासगी माहिती उघड होत असल्याचे सिद्ध केलेले नाही,” असं सरकारने आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारला त्याने पुन्हा प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, “तुम्ही म्हणत आहात की इथे काहीच उघड झालं नाहीय. आपण इथे पाहूयात. मी तुम्हाला उद्या भेटतो,” असं ट्विट या हॅकरने केलं आहे. काही तासांनंतर याच हॅकरने (Elliot Alderson) ट्विट करुन ‘तुम्हाला ट्रँग्युलेशन म्हणजे काय ठाऊक आहे का?’ असा सवाल भारत सरकारला केला आहे.

तत्पूर्वी, जुलै २०१८ मध्ये ट्राय’चे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी आधार कार्डची माहिती किती सुरक्षित आहे हे देशाला दाखवण्यासाठी थेट आधार क्रमांक हॅक करुन दाखवा असं चॅलेंजच दिलं होतं. त्यासाठी त्यांनी आपला आधार क्रमांक ट्विटरवरुन शेअर केला. आधार कार्डचा नंबर सार्वजनिक केल्याने गोपनिय माहिती उघड होते असा आरोप याआधी वारंवार करण्यात आला होता. त्यामुळेच आधार कार्डच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल झाल्या होत्या.

परंतु शर्मा यांना ते धाडस आणि नको ती ‘ट्राय’ चांगलीच अंगलट आल्याचं समोर आलं होतं आणि आधार कार्ड वरील व्यक्तिगत माहिती किती असुरक्षित आहे हे सुद्धा त्या अनुषंगाने सिद्ध झालं होतं. कारण आधार क्रमांक शेअर करण्याच्या थोड्याच वेळात फ्रान्समधील सुरक्षा संशोधक असल्याचा दावा करणाऱ्या इलिअट अल्डरसन (Elliot Alderson) या हॅकरणे शर्मा यांची वैयक्तिक संपूर्ण माहिती उघड केली होती.

इलिअट अल्डरसन या फ्रेंच हॅकरणे शर्मा यांचं हे आवाहन स्वीकारलं होतं आणि काही क्षणातच शर्मा यांचा आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाइल क्रमांकच थेट त्याने ट्विट केला. त्यानंतर इलिअट अल्डरसने एकामागोमाग एक ट्विट करत शर्मा यांच्या खासगी जीवनातील अनेक माहिती जाहीर केली होती. त्यात शर्मा यांच्या घराचा पत्ता, जन्मतिथी, फोन क्रमांक इत्यादींचा समावेश होता. त्यानंतर त्याने शर्मा यांचे खासगी फोटोही हॅकरने शोधले आणि ट्विट केले होते. परंतु फोटो शेअर करताना शर्मा यांच्या खासगी आयुष्यात अडचणी नकोत म्हणून काही फोटो त्याने ब्लर करत योग्य ती काळजी घेतली होती आणि त्यात त्यांच्या पॅन कार्डचाही समावेश होता.

शर्मा यांची खासगी माहिती शेअर करतानाच इलिअट अल्डरसनने म्हटलं की, ‘आधार क्रमांक असुरक्षित आहे आणि याद्वारे तुमच्या घराच्या पत्त्यापासून फोन क्रमांकापर्यंत सर्वच खासगी माहिती उघड होते. परंतु मी आता इथेच थांबतो आणि आधारचा क्रमांक सार्वजनिक करणं किती धोकादायक आहे हे आता तरी तुम्हाला समजलं असेल अशी आशा बाळगतो’ असं त्याने शर्मा यांना सूचक ट्विट केलं होतं. आणि आता आरोग्य सेतू अँपच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तोच हॅकर पुन्हा म्हणाला आहे…उद्या पुन्हा भेटूच!

 

News English Summary: The central government has claimed that the health bridge app, which provides all the information related to corona, is safe. A French hacker Elliot Alderson tweeted on Tuesday that “the information of 90 million Indians is in danger of being leaked.” It is against this background that the government has given an explanation. “There is no information about the theft or security of the information on this app. Also, these hackers have not proved that private information is being disclosed from this app, ”the government said in its explanation.

News English Title: Story corona virus No Data Breach In Aarogya Setu App Government On Hackers Red Flag News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Aarogya Setu App(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x