14 December 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

कर्नाटक विधानसभा निवडणूक, बजरंगबलीचा आशीर्वाद राहुल गांधींना, तर आज शनिवारीपासून आणि 2024 पूर्वी मोदी-शहांवर शनीची वक्रदृष्टी

Karnataka Assembly Election Result 2023

Karnataka Assembly Election Result 2023 | कर्नाटकात काँग्रेसकडून नरेंद्र मोदी आणि भाजपचा दणदणीत पराभव होणार हे निश्चित झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यातील २२४ जागांपैकी सध्या १२८ जागा काँग्रेसच्या वाट्याला जात आहेत, तर बहुमताचा आकडा ११३ आहे. भाजप ६६ जागांवर तर जेडीएस २२ जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. कर्नाटकविधानसभेच्या सर्व २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झाले होते, त्यात ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, “जेव्हा भाजप निवडणूक हरव असतो, तेव्हा नरेंद्र मोदींचा चेहरा वृत्त वाहिन्यांवरून गायब होतो. काँग्रेस निवडणूक जिंकत असताना राहुल गांधींचा चेहरा वृत्त वाहिन्यांवरून गायब होतो. अप्रतिम आहे असा टोला लगावला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाटकात जे वातावरण पाहायला मिळाले, त्याचा परिणाम आज कर्नाटक निवडणूक निकालात स्पष्टपणे दिसून येत आहे. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी जोरदार प्रचार केला. जातीय राजकारण नाकारून कर्नाटकने विकासाचे राजकारण निवडले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होईल.

दक्षिण भारत भाजप मुक्तीच्या दिशेने :
सध्याच्या कलानुसार भाजपला कर्नाटकमध्ये प्रचार करूनही मोठा झटका बसत असल्याचं चित्र आहे. अशात भाजपच्या मिशन-दक्षिणलाही हा मोठा धक्का असू शकतो. दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये भाजपला अद्याप स्वतःला पाय रोवता आले नाही. दक्षिणेकडील सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या 130 जागा आहेत, ज्या एकूण लोकसभेच्या जागांपैकी सुमारे 25 टक्के आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka Assembly Election Result 2023 Big Victory trends for Congress party since morning check details on 13 May 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x