मुंबई : एटीएम कार्ड क्लोनिंग करून एटीएम मशिनमधून पैसे काढण्याच्या घटनेत वाढ होत आहे. यावर खबरीचा उपाय म्हणून आता एटीएम कार्ड न वापरता एटीएम मशिनमधून पैसे काढता येणार आहेत. अनेक बँक धारकांसाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो या अँपने अलीकडेच हि सेवा सुरु केली आहे.
एसबीआय योनो हे स्टेट बँकेचं अँप आहे. या अँप मध्ये नेटबँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागते. त्यानंतर मोबाईलवर एक सहा आकडी क्रमांक येईल. तो क्रमांक जवळच्या एसबीआय मशीन टाकला कि अगदी सहज रित्या कोणतीही भीती न बाळगता पैसे काढता येणार आहेत. हा क्रमांक पुढील ३० मिनीटांसाठीच वैध असणार आहे. हि प्रक्रिया वापरून ग्राहक कमीत कमी ५०० ते १०,००० रुपये काढू शकतात.
ग्राहक दिवसभरात २०,००० रुपये काढू शकतात. एसबीआय च्या १६,५०० एटीएम मध्ये हि सुविधा उपलब्ध आहे. या उपायामुळे क्लोनिंग करून पैसे काढणे नक्कीच बंद होणार आहे. ग्राहकांनी नक्कीच याचा फायदा करून घ्यावा.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		