11 December 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

पीएमसी बँकेच्या खातेदारांची हायकोर्टाच्याबाहेर 'RBI चोर है' घोषणाबाजी

Mumbai High Court, PMC Bank, Punjab and Maharashtra Co Operative Bank, RBI

मुंबई: PMC बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी आरबीआय चोर है च्या घोषणाही दिल्या. मुंबई हायकोर्टाबाहेर पीएमसीचे खातेदार जमले होते. हमारा पैसा वापस कर दो आरबीआय अशाही घोषणा देण्यात आल्या. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत काय होणार याकडे खातेदारांचं लक्ष लागलं होतं. अशात ही सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरबीआय विरोधात खातेदारांनी घोषणाबाजी केली.

मागील काही दिवसात अनेक ग्राहकांनी काळजीच्या धक्क्याने स्वतःचे प्राण गमावले आहेत. कुलदिपकौर विग (६४) या खारघर सेक्टर-१० मध्ये पती, मुलगा, सून व मुलगी यांच्यासह भाड्याच्या खोलीत राहत होत्या. पीएमसी बँकेमध्ये कुलदिपकौर व त्यांचे पती वरिंदरसिंग विग, मुलगा सुखबिरसिंग या तिघांचे खाते असून या तीघांचे पीएमसी बँकेमध्ये १५ लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट होते. तसेच कुलदिपसिंग व वरिंदरसिंग या पतीपत्नीच्या खात्यामध्ये दीड लाख रुपयांची तर सुखबीर याच्या खात्यामध्ये ७० हजारांची रक्कम होती. पीएमसी बँकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर हे पैसे बँकेत अडकले. पैसे नसल्याने विग कुटुंबियांनी यावर्षी दिवाळीही साजरी केली नाही. त्यामुळे बँकेत अडकलेली रक्कम मिळेल की नाही, या चिंतेत विग कुटुंबीय होते.

तत्पूर्वी मुंबईत राहणाऱ्या भारती सदारंगानी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. भारती सदारंगानी यांची मुलगी हेमा या पीएमएसी खातेदारक असून त्यांचे पीएमसी बँकेत तब्बल अडीच कोटी ठेवी होती. आपल्या मुलीचे आणि जावयाचे पैसे पीएमसी खात्यात अडकल्याने त्या अनेक दिवसांपासून चिंतेत होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तसेच सदारंगानी यांना कोणताही आजार नसल्याची माहिती त्यांच्या मुलीने आणि जावयाने दिली होती.

तसेच पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत खाते असलेले ग्राहक संजय गुलाटी यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याला २४ तासही उलटत नाहीत तोच आज दुपारी मुलुंड येथील ६१ वर्षीय खातेधारक फट्टोमल पंजाबी यांना मृत्यूने गाठले. बँकेवरील निर्बंधांमुळे प्रचंड तणावाखाली असलेल्या फट्टोमल यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या गोकुळ रुग्णालयात नेले मात्र तिथे तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे स्पष्ट झाले. फट्टोमल हे बँकेत जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटपीएमसी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत पीएमसीच्या चार खातेदारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा एका पीएमसीच्या खातेदारकाच्या आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हृयविकाराच्या झटक्याने मुंबईत राहणाऱ्या भारती सदारंगानी (७३) यांचा मृत्यू झाला आहे.का आल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. फट्टोमल यांना विकास आणि गीता (विवाहित) अशी दोन मुलं असून मार्च महिन्यात पत्नीचं निधन झाल्यानंतर ते घरात एकटेच राहत होते, असे त्यांचे बंधू दीपक पंजाबी यांनी सांगितले.

मुलुंड येथील फत्तेमुल पंजाबी यांचा स्वत:चा व्यवसाय होता. पीएमसीच्या प्रकरणानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आगामी निवडणुकीत ‘मतदान करू नका’ असे लिहून निषेध व्यक्त केला होता. गेले काही दिवस कौटुंबिक अडचणी आणि पीएमसीत अडकलेल्या रकमेमुळे ते सतत चिंतेत असायचे, असे फत्तेमुल यांचे परिचित गुरजीत यांनी सांगितले होते.

त्यानंतर खातेदार असलेल्या डॉक्टर योगिता बिजलानी यांनी मंगळवारी संध्याकाळी औषधांचे अतिरिक्त सेवन करून आत्महत्या केली. डॉ. बिजलानी यांचे पीएमसी बँकेत खाते असून त्यामध्ये एक कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली होती. मात्र या कारणामुळेच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले का, याबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिजलानी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतून मुंबईत माहेरी आल्या होत्या. त्यांनी अमेरिकेतही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x