12 December 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

पवारसाहेब हे मुरब्बी नेते, पण लवकरच महाशिवआघाडी अस्तित्वात येईल: आ. प्रणिती शिंदे

Congress MLA Praniti Shinde, Shivsena, NCP, Shivsena, Mahashivaghadi

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुरब्बी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आत्ताच अनुमान लावणे चुकीचे आहे. मात्र, लवकरच महाशिवआघाडी अस्तित्वात आलेली पाहायला मिळेल, असं मोठं वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

तत्पूर्वी सरकार स्थापनेचं शिवसेना-भारतीय जनता पक्षाला विचारा असं सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचं पवार यांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-एनसीपी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतची स्पष्टता अजून आहे.

सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा तिथे ए. के. अँटनीही हजर होते असंही शरद पवार यांनी म्हटलं. महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा पेच का सुटत नाही यावरच आम्ही चर्चा करतो आहोत, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जो काही पेच निर्माण झाला त्याबाबत सोनिया गांधी यांना मी माझ्या परिने माहिती दिली.

बैठकीत कोणत्याही पक्षासोबत सरकार बनविण्यावरुन चर्चा झाली नाही. जे संख्याबळ आहे त्याबाबत चर्चा झाली. आमच्यासोबत समाजवादी पार्टी, स्वाभिमान शेतकरी संघटना, कवाडे गट अशा अनेक संघटना आघाडीत होत्या. आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही. जे लोकं आमच्यासोबत निवडणुकीत होते त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे असंही शरद पवारांनी सांगितले.

विशेष म्हणजे एकीकडे बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पवारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाली असल्याची माहिती देण्याता आली आहे. दरम्यान, पवारांनीच राऊतांना दिल्लीला बोलावलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या राजकीय घडामोड़ींमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x