वॉशिंग्टन : अमेरिकेत अवैधरीत्या घुसणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी देशाच्या दक्षिण मेक्सिको सीमेवर मोठी भिंत उभारण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या विचारापर्यंत पोहोचलो आहोत, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्ष संकेत दिल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर अमेरिकन काँग्रेसच्या कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय भिंत उभारण्याच्या दिशेने डोनाल्ड ट्रम्प पावले उचलू शकतील. आपत्कालीन निधी दक्षिण मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी खर्च करण्याचे अधिकार त्यांना मिळतील असे समजते.
पुढे ट्रम्प यांनी सांगितले की, सीमा सुरक्षेवर विरोधक डेमोक्रॅटिकसोबत चर्चा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नैंसी पेलोसी यांच्यावर त्यांनी हट्टी तसेच आडमुठी भूमिका घेतल्याचा आरोप सुद्धा यावेळी केला.
