15 December 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

कोरोना इम्पॅक्ट: सेन्सेक्स १६०० तर निफ्टी ४७० अंकानी घसरला

Bombay Stock Exchange, BSE, NSE, Nifty

मुंबई, १२ मार्च: कोरोना व्हायरसबाधितांची संख्या जगभरात वाढत असताना त्याचा गंभीर परिणाम आता आर्थिक आघाडीवरही दिसू लागला आहे. जगातील सर्वच महत्त्वाच्या शेअर बाजारांच्या निर्देशांकात पडझड झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात गुरुवारी सकाळी मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १८०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीमध्येही ५०० अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

मार्च २०१८ नंतर पहिल्यांदाच निफ्टी १० हजाराच्या खाली आला आहे. ४० हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये ३३ हजारापर्यंत घसरण झाली आहे. आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले आहे. सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. सेन्सेक्सची पडझड होण्यामागे ही सुद्धा दोन प्रमुख कारणे आहेत.

जागतिक संकेतांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीची आज मोठ्या घसरणीने सुरुवात झाली. मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्य़े विक्रीही पाहायला मिळात आहे. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स २.२७ टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक १.१६ टक्क्यांनी घसरला आहे. तेल-गॅस समभागातही आज मोठी घसरण दिसून येत आहे. बीएसईचा तेल आणि गॅस निर्देशांक ६ टक्क्यांच्या घसरणीसह व्यापार करीत आहे.

 

News English Summery: As the number of Corona virus outbreaks continues to increase worldwide, its serious consequences are now beginning to appear on the financial front as well. All the major stock markets in the world are witnessing a fall in the index. The stock market index fell sharply on Thursday morning. The stock market index of Mumbai fell by 1800 points. The National Stock Exchange, the Nifty, also saw a fall of 500 points. For the first time since March 2018, the Nifty has fallen below 10 thousand. The Sensex, which has reached 40,000, has dropped by 33,000. The RBI has banned Yes Bank. Saudi Arabia and Russia have waged wars over oil prices. As a result, crude oil prices have fallen in the international market. These are also two of the major reasons behind the fall of the Sensex.

 

News English Title: Story Bombay Stock Exchange Sensex plummets over 1800 points Nifty slips below 10000 Mark

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x