2 May 2025 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

यूपीए सरकारने चांगली धोरणे राबविली होती, आज ते होताना दिसत नाही - अभिजीत बॅनर्जी

Lockdown, Nobel winner Abhijit Banerjee, Congress MP Rahul Gandhi

नवी दिल्ली, ५ मे: करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वेगवेगळ्या मान्यवरांशी लॉकडाऊन चर्चा करताना अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. मंगळवारी त्यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी, अभिजीत बॅनर्जी यांनी ‘यूपीए सरकारनं चांगल्या अर्थनीती लागू केल्या होत्या. परंतु, आता मात्र त्या नीती सरकार लागू करताना दिसत नाही. यूपीए सरकारनं ज्या आधारावर या योजना लागू केल्या होत्या त्यांना सद्य सरकारनंही योग्य असल्याचं सांगितलंय आणि त्याच्यावरच काम केलंय’, असं म्हटलंय.

राहुल गांधींनी अभिजीत यांना विचारले, नोबेल पारितोषिक जाहीर झाले त्यावेळी तुम्हाला काय वाटले, हा पुरस्कार मिळेल, असे वाटले होत का? या प्रश्नावर अभिजीत यांनी उत्तर दिले, मी असा असा विचार कधीच केला नव्हता.

अभिजीत बॅनर्जी म्हणाले की, यूपीए सरकारने खूप चांगली धोरणे राबविली होती, पण आता तसे होताना दिसत नाही. हे सरकार ती धोरणे राबवत नाही. आधारसारखी योजना जी यूपीए सरकारने राबविली, या सरकारनेही ती योग्यच असल्याचे सांगितले आणि त्यावर कार्य केले. आजच्या काळात अशी सुविधा अगदी योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकते, परंतु ती करता आलेली नाही. म्हणजेच राष्ट्रव्यापी योजना लागू केलेली नाही.

देशातल्या जनतेच्या हाती थेट पैसा दिल्यास समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतील, अशी भीती बॅनर्जींनी व्यक्त केली. ‘अर्थव्यवस्था ठप्प असताना लोकांच्या हाती थेट पैसा देणं योग्य ठरणार नाही. उत्पादन आणि मागणी यामधील अंतर वाढल्यास महागाई वाढेल. त्यामुळे सरकारनं आता लोकांच्या हाती पैसा न देता दोन महिन्यांनंतर द्यावा. लॉकडाऊन संपल्यानंतर तो लोकांना खर्च करता येईल,’ असं बॅनर्जी यांनी म्हटलं.

आज देशाला पैशाची चिंता भेडसावत आहे. बँकांसमोर अनेक आव्हानं आहेत तसंच नोकऱ्या वाचवणंही कठीण होऊन बसतंय, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. यावर, ‘देशाला एका आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. अमेरिका-जपान सारख्या देशांनीही हेच केलंय. परंतु, आपल्याकडे मात्र असं घडलेलं नाही. छोट्या उद्योगांना मदतीची गरज आहे. या तिमाहीचं कर्ज माफ करण्याची गरज आहे.’ असं म्हणत अभिजीत बॅनर्जी यांनी या परिस्थितीच्या आकलनाला दुजोरा दिला.

 

News English Summary: Abhijeet Banerjee said that the UPA government had implemented very good policies, but now it does not seem to be happening. This government is not implementing those policies. The UPA government, which implemented a scheme like Aadhaar, also said it was right and acted on it. Such a facility may prove to be quite appropriate nowadays, but it has not been possible. That is, the nationwide plan has not been implemented.

News English Title: Story corona virus lockdown congress MP Rahul Gandhi in conversation with Nobel winner Abhijit Banerjee congress News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या