12 December 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

न खाऊँगा, न खाने दूँगा | लाचखोरीत भारत आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर

Transparency International Survey Report, Corruption, India on top

नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर: स्वतःला देशाचे चौकीदार संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘न खाऊँगा, न खाने दूँगा’, असे नारे देत देशवासियांना मोठ्या अपेक्षा दाखवल्या होत्या. देशातील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याची घोषणा मोदींनी मोठ्या आवेशाने केली होती. मात्र त्यानंतरच वास्तव समोर येताना दिसत आहे. ऑपरेशन लोटसच्या नावानेच देशात सध्या सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यापूर्वी विरोधकांनी अनेकदा केला आहे. मात्र आता देशातील एकूण लाचखोरी आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे असंच म्हणावं लागेल.

कारण लाचखोरीत भारताची परिस्थिती आशिया खंडातील देशांमध्ये सर्वात वाईट आहे. लाचखोरीच्याबाबतीत आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक (India is on top in corruption as per report) लागतो. ‘ट्रान्फरन्सी इंटरनॅशनल’ संस्थेच्या (Transparency International Survey Report) याबाबतचे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये हि धक्कादायक आणि चिंता वाढविणारी माहिती अधिकृतपणे समोर आली आहे.

घुसखोरीच्या बाबतीत भारतात घुसखोरीचा दर हा तब्बल ३९ टक्के इतका आहे. मागील बारा महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे. सर्वेक्षणातील माहितीनुसार भारतात सरकारी सुविधांसाठी ४६ टक्के लोक हे वैयक्तिक ओखळीचा वापर करतात. यातील ३२ टक्के लोकांनी लाच दिली नाही तर कामच होत नाही, असं म्हटलं आहे.

भारतानंतर सर्वाधिक लाचखोरी केली जाणाऱ्या यादीमध्ये कंबोडियाचा दुसरा क्रमांक लागतो. यात ३७ टक्के लोक लाच देतात. तर ३० टक्क्यांसह इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर आहे. मालदीव आणि जापानमध्ये लाचखोरीचा दर संपूर्ण आशियात सर्वात कमी आहे. या देशांमध्ये केवळ २ टक्के लोक लाच देण्यासाठीची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे, बांगलादेशमध्ये लाचखोरीचा दर भारतापेक्षा कमी २४ टक्के इतका आहे. तर श्रीलंकेत हाच दर १६ टक्के इतका आहे जो भारतासाठी शरमेची गोष्ट आहे (Bangladesh and Sri Lanka also below of India in corruption as per report).

ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने १७ देशांमधील २० हजार लोकांना काही प्रश्न विचारले (Transparency International Survey Report was made in 17 countries). हे सर्वेक्षण जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये घेण्यात आले होते. सर्वेक्षणात सरकारी सेवा देणाऱ्या ६ क्षेत्रांचा समावेश केला गेला होता. सरकारी सेवांमधील भ्रष्टाचारामुळे सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते असे सर्वेक्षणात दर ४ लोकांमागे तीन लोकांचे म्हणणे आहे. तर तीन लोकांमागे प्रत्येकी एक जण आपला लोकप्रतिनिधी भ्रष्ट असल्याचे मानतो.

 

News English Summary: Because India’s bribery situation is the worst in Asia. India ranks first among Asian countries in terms of bribery (India is on top in corruption as per report). The Transparency International Survey Report has been published. The shocking and disturbing information has officially come to light. In terms of infiltration, the infiltration rate in India is as high as 39 per cent. In the last 12 months, 47 per cent people believe that corruption has increased in the country.

News English Title: Transparency International Survey Report of corruption India on top news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x