30 April 2024 12:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Multibagger Dividend | आधी 2000 टक्के आणि आता 1200 टक्के डिव्हीडंड, या शेअरने सर्व बाजूने लाखोत कमाई होतेय, कोणता स्टॉक?

Multibagger Dividend

Multibagger Dividend | मॅगी नूडल्स चे नाव तर आपण सर्वांनी एकले असेल. या मॅगी नूडल्सची निर्माता कंपनी “नेस्ले इंडिया” आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त गिफ्ट देणार आहे. नेस्ले इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 120 रुपये अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ” नेस्ले कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी पर पडली होती, या बैठकीत 2022 सालासाठी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति शेअरवर 120 रुपये इतका अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” अशी नेस्ले इंडियाने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे.

लाभांशाची रेकॉर्ड तारीख :
नेस्ले कंपनीने 1 नोव्हेंबर 2022 लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. नेस्ले इंडियाने म्हटले आहे की 2022 या वर्षासाठी गुंतवणूकदारांना 120 रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश 1 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा नंतर त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. FMCG कंपनी नेस्लेने लाभांशाची रेकॉर्ड तारीख 1 नोव्हेंबर 2022 असेल असे जाहीर केले आहे. म्हणजेच 31 ऑक्टोबर 2022 रोजी नेस्ले कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर ट्रेड करतील. नेस्लेने यापूर्वी 6 मे 2022 रोजी प्रति शेअर 25 रुपये लाभांश वितरीत केला होता. डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या वर्षासाठी, नेस्ले इंडियाने आपल्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर एकूण 2000 टक्के म्हणजेच 200 रुपये लाभांश वितरीत केला होता.

कंपनीचा तिमाही नफा :
Nestle India ने सप्टेंबर 2022 च्या संपलेल्या तिमाहीत 668.34 कोटी रुपये नफा कमावला असल्याची माहिती दिली आहे. कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 8.25 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर तिमाहीत नेस्ले इंडियाच्या निव्वळ विक्रीमध्ये वार्षिक 18 टक्के वाढ झाली असून 4567 कोटी रुपयांची एकूण विक्री झाली आहे. या मॅगी नूडल्स आणि किट कॅट चॉकलेट मेकर कंपनीची देशांतर्गत विक्रीमध्ये वार्षिक आधारावर 18.3 टक्के वाढ झाली आहे. 19 ऑक्टोबर 2022 रोजी नेस्ले इंडियाचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 19723.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नेस्ले इंडियाचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 10 टक्के वर गेले आहेत. त्याच वेळी, नेस्लेच्या शेअर्समध्ये मागील पाच वर्षांत सुमारे 175 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Dividend has declared by Nestle India for third quarter to existing shareholders on 20 October 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Dividend(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x