12 December 2024 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Torrent Pharmaceuticals Share Price | जबरदस्त शेअर! 240% मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख तपासा

Torrent Pharmaceuticals Share Price

Torrent Pharmaceuticals Share Price | चालू आर्थिक वर्ष 2022-2023 च्या तिसऱ्या तिमाहीचा कालावधी संपला आहे. ‘टोरेंट फार्मा’ कंपनीने आपला डिसेंबर 2022 चा तिमाही निकाल जाहीर केला. या तिमाही निकालानुसार टोरेंट फार्मा कंपनीच्या निव्वळ नफ्यात 14 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 283 कोटी रुपये नफा कमवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये टोरेंट फार्मा कंपनीने 259 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला होता. यावरून असे समजते की 2023 मधील तिसऱ्या तिमाहीत टोरेंट फार्मा कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Torrent Pharmaceuticals Share Price | Torrent Pharmaceuticals Stock Price | BSE 500420 | NSE TORNTPHARM)

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालात कंपनीने माहिती दिली आहे की, मागील आर्थिक वर्षाच्या या तिमाहीतील 2092 कोटी रुपये निव्वळ विक्रीच्या तुलनेत डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये कंपनीने 2459 कोटी रुपये निव्वळ विक्री केली आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी टोरेंट फार्मा कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संचालक मंडळाच्या सदस्यांनी 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 14 रुपये म्हणजेच 240 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

टोरेंट फार्मा लाभांशाची रेकॉर्ड तारीख :
टोरेंट फार्मा कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत संचालक मंडळातील सदस्यांनी आपल्या कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 14 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली. लाभांश वाटपासाठी कंपनीने 3 फेब्रुवारी 2023 ही तारीख रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. टोरेंट फार्मा कंपनी T + 2 या सेटलमेंट श्रेणीमध्ये येत असल्याने कंपनीचे शेअर 2 फेब्रुवारी 2023 रोजी एक्स-डिव्हीडंड म्हणून ट्रेड करतील. BSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार टोरेंट फार्मा कंपनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

कंपनीच्या शेअरची कामगिरी :
बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी टोरेंट फार्मा कंपनीचे शेअर 2 टक्क्यांच्या घसरणीसह 1553 रुपये किमतीवर क्लोज झाले. मागील एका महिन्यात टोरेंट फार्मा कंपनीच्या शेअरची किंमत एक टक्क्यांनी घसरली आहे. तथापि मागील एका वर्षात टोरेंट फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Torrent Pharmaceuticals Share Price 500420 TORNTPHARM stock market live on 26 January 2023.

हॅशटॅग्स

Torrent Pharma Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x