झूम एपवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत उबरने ३५०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार केलं

नवी दिल्ली, १६ मे : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं आहे. यानंतर जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर’वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं होतं की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.
अॅप आधारित कॅब सर्व्हिस पुरवणाऱ्या उबरने ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली होती. युएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमीशनमध्ये (एसईसी) कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली होती. “कोरोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि व्यवसायावर झालेला परिणाम, यामुळे कंपनीने खर्च कमी करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, कस्टमर सपोर्ट आणि रिक्रुटर्स टीममध्ये कपात केली जात आहे. एकूण ३ हजार ७०० फुल-टाइम कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल ” , असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. भविष्यात अजून कपात करावी लागू शकते असे संकेतही कंपनीने दिलेत.
अखेर योजनेनुसार प्रवासी टॅक्सी सेवा देणाऱ्या उबेर कंपनीने नुकतीच १४ टक्के कर्मचारी कपात केली. झूप एपवर घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉलवर कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. साधारण ३ मिनिटभर चाललेल्या या कॉलनंतर ३५०० कर्मचारी बेरोजगार झाले. उबर कस्टरमर कंपनीचे प्रमुख शेवॉलो यांनी झूम एपवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि ३५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत असल्याची माहिती दिली. मंदीचे दिवस असून कर्मचाऱ्यांसाठी ठराविक काम आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांचा आजचा कामाचा शेवटचा दिवस असल्याचे त्यांनी कॉलवर सांगितले.
सध्या कंपनीचा व्यवसाय निम्म्यावर आल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देणं शक्य नाही. उबेरला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात २.९ अरब डॉलरचे नुकसान झाले. यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले. विदेशातील कंपनीच्या गुंतवणुकीवर देखील वाईट परिणाम झाले आहेत.
News English Summary: Chevrolet, head of Uber Customer Company, interacted with employees from the Zoom app and informed them that 3500 employees were being laid off. There are days of recession and there is a lot of work for the employees. He also said that today is the last working day of the employees.
News English Title: Uber 3500 employees are got unemployed information gives on zoom video call News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL