मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी झोमॅटोवर ऑर्डर करण्यात आलेले खाद्य पदार्थ डिलेव्हरी बॉयने उष्टावून, मग ते ग्राहकाला घरपोच दिले होते. त्यानंतर झोमॅटोवर सर्वबाजूने टीका करण्यात आली होती. परंतु, आता झोमॅटोचा अजून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रानामाच्या टीमने ग्राहकाच्या माहितीवरून एक स्ट्रिंग ऑपरेशन केलं असता ते किळसवाण सत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

झोमॅटोवर रेशटोरंट (Restaurant-Hotel) म्हणून नोंदणी असलेले हॉटेल्स हे मुळात हॉटेल्स नसून ते चक्क घाणेरड्या म्हशींचे तबेले आहेत. झोमॅटोवरील हे हॉटेल्स चक्क तबेल्यातून खाद्य पदार्थ बनवून ते झोमॅटोच्या मार्फत ग्राहकाला घरपोच करतात. सदर म्हशीचा गोठा, ज्याला झोमॅटोने हॉटेल म्हणून दाखवले आहे ते आतून आणि बाहेरून घाणीच्या साम्राज्यात थाटलेले आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय खात असलेले पदार्थ शरीरासाठी किती हानिकारक आहेत, याचा अंदाज तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर येऊ शकतो. खाद्य पदार्थ बनवण्यासाठी आतमध्ये एक लहानशी जागा बनवली असून ऑर्डर घेण्यासाठी २-३ कॉम्पुटरची सोया आतमध्ये एका कोपऱ्यात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी जेव्हा ऑर्डर येते तेव्हा गोठ्याबाहेरील लाईट्स जाणीवपूर्वक बंद केल्या जातात जेणेकरून संपूर्ण दृश्य दिसू नये म्हणून. झोमॅटो अशा लोकांना कोणत्याही कागद पत्रांची पूर्तता आणि चौकशी न करताच हॉटेल म्हणून मान्यता देतात. झोमॅटो सुद्धा हे प्रकरण दाबण्याचा तयारीत असल्याचे वृत्त आहे आणि केवळ त्या हॉटेलची नोंदणी बंद करून वेळ मारून नेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

मुंबईतील ९९ तबेला, मालापाडोंगरी १, अंधेरी येथील हा तबेला आहे. अंधेरी येथील एका म्हशीच्या गोठ्यात हे थाटलेले हॉटेल असून, झोमॅटोने त्यांना कोणतीही शहानिशा न करताच परवाना दिला आहे. त्यामुळे झोमॅटो तुमच्या जीवाची आणि आरोग्याची किती काळजी करत याचा प्रत्यय येतो आहे. सदर ग्राहकाने झोमॅटोला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला असून जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तुमच्या जीवाची हेळसांड करणाऱ्या झोमॅटोपासून सावध राहा असच हा व्हिडिओ तुम्हाला सांगेल. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करत असलेलं अन्न पदार्थ हे हॉटेल नाही तर भलत्याच एखाद्या गलिच्छ ठिकाणावरून येण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

VIDEO : हाच तो म्हशीचा गोठा आणि येथूनच झोमॅटो ते तुम्हाला घरपोच करत

Zomato delivering fast food from buffalo shade in mumbai