7 May 2025 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

दणका! कार्यक्रमांमधून विशिष्ट पक्षाच्या स्कीम्स प्रमोट केल्याने झी वाहिनीवर कारवाई

Zee News, Narendra Modi

मुंबई : मागील काही दिवसांपासून झी वाहिनीवर आचारसंहितेचे सर्व नियम पायदळी तुडवत मालिकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरू होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पॉलिटीकल पार्टीच्या स्कीम्स प्रमोट करण्यात येत होत्या. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आपला आक्षेप नोंदवत कडक कारवाई केली आहे. आचार संहिता लागु असताना अशा प्रकारे प्रचार करणे झी वाहिनीला महागात पडले आहे. त्यामुळे आज झी वाहिनीच्या कार्यक्रमांचे प्रसारण रात्री ८ ते १० यावेळेत बंद करण्यात आले होते. झी वाहिनीने प्रचार केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

याविषयी, वाहिनीने आपली बाजु मांडत सांगितले की, एक जबाबदार राष्ट्रीय टेलिव्हिजन नेटवर्क म्हणून झी टीव्हीने कायमच आपल्या कठोर साहित्य मार्गदर्शक तत्वांनुसार साहित्यनिर्मिती केली आहे. टेलिव्हिजनवर प्रसारित कार्यक्रमांमधील काही एपिसोड्समधील विशिष्ट शासकीय योजनांचा उल्लेख हा फक्त जनतेच्या हितासाठी कलात्मक दृष्टिकोनातून करण्यात आला होता.

याविषयी, वाहिनीने आपली बाजु मांडत. कंपनी प्रवक्ता म्हणाले की, “एक जबाबदार राष्ट्रीय टेलिव्हिजन नेटवर्क म्हणून झी टीव्हीने कायमच आपल्या कठोर साहित्य मार्गदर्शक तत्वांनुसार साहित्यनिर्मिती केली आहे. टेलिव्हिजनवर प्रसारित कार्यक्रमांमधील काही एपिसोड्समधील विशिष्ट शासकीय योजनांचा उल्लेख हा फक्त जनतेच्या हितासाठी कलात्मक दृष्टिकोनातून करण्यात आला होता.”

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या