5 November 2024 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
x

Ankita Walawalkar | 'तुझा घो कोण आहे' कोकणहार्टेड गर्लने दिला चाहत्यांच्या प्रश्नांना पूर्णविराम, 'या' दिवशी करणार खुलासा

Highlights:

  • Ankita Walawalkar
  • चाहत्याने विचारला हा प्रश्न :
  • बिग बॉसच्या घराची मनविजेती :
Ankita Walawalkar

Ankita Walawalkar | बिग बॉस फेम आणि सर्वांची लाडकी कोकणहार्टेड गर्ल हीची बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर जोरदार चर्चा होताना दिसतेय. तिच्या चहात्यांनी तिच्याबद्दल अनेक चांगल्या भावना व्यक्त केले आहेत. अंकिताने बिग बॉसची ट्रॉफी जरी जिंकली नाही तरीसुद्धा तिने प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रेक्षकाच्या मनावर स्वतःचं नाव कोरलं आहे.

नावाप्रमाणेच कोकण हार्टेडगर्ल ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी मनविजेती ठरली आहे. अंकिताचा साधे गोळेपणा त्याचबरोबर तिच्या बोलण्यातला ठसकेदारपणा प्रत्येकालाच आवडतो. सोशल मीडियावर देखील तिथे लाखो चाहते आहेत. दरम्यान बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अंकिताच्या जोडीदाराची चर्चा झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर अंकिताने बिग बॉसच्या घराबाहेर पाऊल ठेवतात तिच्या जोडीदाराबाबतच्या चर्चा नाव पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

चाहत्याने विचारला हा प्रश्न :
कोकण हार्टेड गर्लने इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी ठेवली आहे. यामध्ये एका च्याहत्याने ‘तुझा घो कोण आहे आता सांग ना झालं बिगबॉस मी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे’. असा प्रश्न केला आहे. त्यानंतर या प्रश्नावर अंकिताने केवळ दोन शब्दांत उत्तर देऊन प्रश्नाला फुल स्टॉप दिला आहे. अंकिता म्हटली ,’12 ऑक्टोबर’. तिच्या या उत्तरानंतर तिचे चाहते 12 ऑक्टोबरची वाट पाहत आहेत. अनेकांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे की, 12 ऑक्टोबरला अंकिता साखरपुडा करणार आहे काय. आता 12 ऑक्टोबरलाच अंकिताच्या जोडीदाराबाबतची सर्व माहिती आपल्याला समजणार आहे.

बिग बॉसच्या घराची मनविजेती :
अंकिताने बिग बॉसच्या घराची ट्रॉफी नेली नसली तरी, संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्स आणि कौतुक अंकिताच्या चाहत्यांनी केलं आहे. दरम्यान बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विनर ‘सुरज चव्हाण’ याने बिग बॉसची ट्रॉफी मिळवून महाविजेताचा मान पटकावला आहे. तर, अभिजीत सावंत हा बिग बॉसच्या फर्स्ट रनरअप म्हणजेच उपविजेता ठरला आहे. ट्रॉफी जिंकून आल्याबरोबर सुरज आणि घरातील सर्व सदस्यांची बिग बॉसची संपूर्ण टीम एक साथ आणि जल्लोषात पार्टी करताना देखील दिसले आहेत. यादरम्यानच्या बऱ्याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Latest Marathi News | Ankita Walawalkar 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ankita Walawalkar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x