15 December 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा
x

Bigg Boss Marathi | अखरे निक्कीने पटकावलं शेवटच्या आठवड्यातील तिकीट टू फिनाले, नेटकऱ्यांच्या कमेंट - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • ग्रँड फिनालेचे पहिले तिकीट मिळणारी सदस्य ठरली निक्की तांबोळी :
  • नेटकऱ्यांच्या कमेंट ने वेधले लक्ष :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | सध्या बिग बॉस मराठीच्या घरात सर्वचजण तिकीट टू फिनालेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. दरम्यान सर्वात पहिलं तिकीट कोणाला मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती. अखेर सर्वांची लाडकी बाईईई म्हणजेच निक्की तांबोळी हिने तिकीट टू फिनाले मिळवत बाजी मारली आहे. घरातील सदस्यांपैकी सर्वात पहिलं तिकीट निक्कीने मिळवलं म्हणून घरातील काही सदस्य आणि प्रेक्षक वर्ग देखील नाराज असल्याचा पाहायला मिळतोय. परंतु निक्कीचे चाहते तिला पहिलं तिकीट मिळालं म्हणून फारच खुश आहेत.

ग्रँड फिनालेचे पहिले तिकीट मिळणारी सदस्य ठरली निक्की तांबोळी :

ग्रँड फिनालेचं पहिलं तिकीट पटकावून निक्कीने बाजी मारली आहे. निक्कीने पहिले तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. गार्डन एरियामध्ये पार पडणाऱ्या चक्रव्यूव टास्कदरम्यान म्युचल फंडची सर्वाधिक रक्कम निक्की तांबोळीकडे असल्यामुळे ती कोणताही टास्क पार न पाडता भेटत तिकीट टू फिनालेची पहिली उमेदवार ठरली आहे. दरम्यान निक्की आणि अरबाजची केमिस्ट्री, त्यांच्यातील प्रेम, त्यांची जिव्हाळ्याची मैत्री अनेकजण मिस करत आहेत. निक्कीने जरी तिकीट मिळवलं असलं तरी, विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट ने वेधले लक्ष :

तिकीट जरी निक्कीला मिळालं असलं तरी, प्रेक्षकांच्या मनात विजेताची प्रतिमा कोणा दुसऱ्याचीच आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून कळतंय की फार कमी जणांना निक्की विजेता व्हावी असं वाटत आहे. परंतु प्रेक्षकांच्या तोंडात फक्त सुरज आणि अंकिता या दोघांचाच नाव विजेता म्हणून असलेलं पाहायला मिळतंय. कलर्स मराठीने निक्की तांबोळीच्या तिकीट टू फिनाले lचा पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या पोस्टला चहात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून कमेंटमध्ये कौतुक असा वर्षाव केला आहे. एक जण म्हणतोय की,”तिकीट कोणाला पण भेटू द्या फक्त सुरजच जिंकणार”. तर आणखीन एकजण म्हणतोय,”विनर सुरज किंवा अंकिता व्हायला पाहिजे बस”. आणखीन एका युजरने अशी कमेंट केली आहे की,” कोणी काही म्हणू पण शो मात्र नक्कीमुळे हिट झाला”. अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्स या पोस्टला आल्या आहेत.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x