25 January 2025 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या
x

Bigg Boss Marathi | निक्कीला मारलेली चापट आर्याला पडली महागात; भाऊंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष, आता पुढे काय?

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • तिला जेलबंद केलं
  • ‘ट्रॉफी मिळो किंवा न मिळो’…
  • किचन एरियामध्ये असताना बाचाबाची
  • सोशल मीडियावर चर्चांना उधाण
  • भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमधील कालच्या भागात आर्या आणि निक्कीमध्ये झटापट झाल्याची दिसली. या झटापटीत जादुई हिरा मिळवण्याच्या नादात निक्की आणि आर्या या दोघींमध्ये चांगलीच झुंबड पेटलेली पाहायला मिळाली. दरम्यान झालेल्या झटापटीमध्ये आर्या हिने निक्कीच्या कानाखाली जाळ पेटवत बिग बॉसच्या घरामधील नियमांचं उल्लंघन केलं.

तिला जेलबंद केलं
अखेर प्रेक्षक कालचा भाग पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक होते. रात्री नऊ वाजता दाखवल्याप्रमाणे बिग बॉस यांनी आर्याच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करून तिला जेलबंद केलं. या गोष्टीचा आर्याला देखील चांगलाच पश्चाताप झाला.

‘ट्रॉफी मिळो किंवा न मिळो’…
‘ट्रॉफी मिळो किंवा न मिळो मला हिचा गर्व उतरवायचाय’ असं जानवी किलेकर हिने नक्की बद्दल बोलताना सांगितलं. त्यानंतर बिग बॉस यांनी सध्यापूर्ती आर्याला शिक्षा ठोठावून अंतिम निर्णय भाऊंच्या धक्क्यावर घेतला जाईल असं सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या शनिवारच्या भागात घरातील सदस्यांनी घातलेल्या राड्यामुळे रितेश भाऊंची रिएक्शन पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

किचन एरियामध्ये असताना बाचाबाची
पुढे जानवी आणि निक्कीमध्ये किचन एरियामध्ये असताना बाचाबाची झाल्याची दिसली. जानवीचा भाताचा टोप अरबाजने घेतल्यामुळे तिने दोघांनाही चांगलंच सूनवलं. भांडणादरम्यान जानवीने ‘तुला कोण ओळखत नव्हतं मराठी जनता म्हणून इथे आली’, ‘तुझ्यात दम असेल तर मला बाहेर काढून दाखव’, असं जानवी निक्किला म्हणाली आहे.

सोशल मीडियावर चर्चांना उधाण
बिग बॉसच्या घरातील कालच्या कृत्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी आर्याचं कौतुक केलेलं पाहायला मिळतंय. दरम्यान नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिलंय की,’आर्याने चुकी केली परत दोन हाणायला पाहिजे होत्या’, तर आणखीन एकाने लिहिलंय,’ अरबाजने जानवीचा हात खूप जोरात ओढला त्याला सुद्धा शिक्षा हवी,.’आर्याला बाहेर काढले तर इथून पुढे आम्ही बिग बॉस मराठी शो बघणार नाही’. अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्स आलेल्या पाहायला मिळाल्या.

भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल
त्यानंतर आज दाखवल्या जाणाऱ्या भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये रितेश भाऊ आर्याला जेलमधून बाहेर यायला सांगतात. त्यानंतर ‘तुम्ही स्वतःला काय समजता तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार?’. पुढे रितेश भाऊ म्हणतात की,’मी बिग बॉस यांना सांगतो त्यांनी त्यांचा निर्णय सांगावा’. प्रोमो पाहून आर्या घराबाहेर पडणार की नाही?, बिग बॉस नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. आज रात्री नऊ वाजता होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर सर्व प्रकरणाचा उलगडा पाहायला मिळणार आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Vs Aarya 14 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x