6 May 2025 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

आपल्याला मृत्यूच्या 8-12 आठवड्यांनंतर लसचा दुसरा डोस मिळू शकेल का?

Vaccination

नवी दिल्ली, २० मे | कोरोनाचा देशात शिरकाव होऊन आता वर्ष लोटलं आहे. पहिल्या लाटेनंतर देशात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. यात दिलासा देणारी बाब होती ती म्हणजे करोनावरील लस. करोनावरील लशींच्या आपतकालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आता सगळ्याचं लशीकरण होईल आणि करोना संपेल, अशीच जवळपास सगळ्याचा समज होता. मात्र, हे सगळं अंदाज चुकले. एकीकडे देशात करोनाचे नवनवे म्युटंट आढळून येत असताना लसीकरणाच्या कार्यक्रमाला खिळ बसली आहे. त्यातच सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने भारतातील कोविशिल्ड लशींच्या दोन डोसमधील कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केला आहे. तज्ज्ञांच्या अहवालानंतर हा निर्णय घेतला असल्याचंही सरकाने म्हटलं आहे. कोविशिल्डच्या पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जर जास्त अंतर असेल, तर मधला काळ हा अँटीबॉडीज तयार होण्यासाठी जास्त प्रभावी ठरु शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारने या निर्णयाची माहिती देताना म्हटलेलं होते.

दुसरीकडे देशात प्रतिदिन होणारे मृत्यू थांबत नाहीत आणि अनेक राज्यांमध्ये मृत्यूचं तांडव सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. याच विषयाला अनुसरून दाक्षिणात्य अभिनेता सिध्दार्थने एक खोचक प्रश्न उपस्थित केला आहे. सिध्दार्थने ट्विट करताना म्हटलंय की, “आपल्याला मृत्यूच्या 8-12 आठवड्यांनंतर लसचा दुसरा शॉट मिळू शकेल का?.

 

News English Summary: Everyday deaths in the country do not stop and in many states the ordeal of death is on. Southern actor Siddharth has posed a poignant question on the same subject. Siddharth tweeted, “Can you get another shot of vaccine 8-12 weeks after death?

News English Title: Can you get the second shot of vaccine 8 12 weeks after you die said south actor Siddharth news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या