18 May 2021 9:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

रिहानाचा फोटो शेअर करत कंगनाने खिल्ली उडवली | नेटकऱ्यांनी कंगनाला तिचे फोटो दाखवले

Kangana Ranaut, Rihanna, Farmers Protest

नवी दिल्ली, ०३ फेब्रुवारी: केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्याचबरोबर या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. रिहानाचं हे ट्विट बरंच चर्चेत आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या स्थानी असणाऱ्या रिहानाने ट्विट केल्याने सोशल नेटवर्किंगवर आणि बातम्यांमध्ये या ट्विटची चांगलीच चर्चा आहे.

रिहानाच्या ट्विटवर प्रत्युत्तर देताना कंगनाने लिहलं की, ‘कोणीही याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. जेणेकरुन चीनसारखे देश आपल्या देशाचा ताबा घेतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारखे मूर्ख नाही आहोत जो आमचा देश विकू’

त्यानंतर पुन्हा कंगनाने एक ट्विट करत स्वतःचा पूजापाठ करतानाच फोटो शेअर करत त्यासोबत रिहानाचाही फोटो शेअर केला. मात्र त्यानंतर भारतीय नेटिझन्सनी कंगनाचे “त्या” प्रकारात मोडणारे सर्व फिट शेअर करण्याचा सपाटा लावला आणि कंगनाची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे.

 

 

News English Summary: Replying to Rihanna’s tweet, Kangana wrote, “No one is talking about it because they are not farmers but terrorists trying to divide India. So that countries like China will take over their country and make Chinese colonies like America. You keep quiet, you fool. We are not fools like you to sell our country.

News English Title: Kangana Ranaut tweet photos of Rihanna to make controversy news updates.

हॅशटॅग्स

#filmy(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x