Nawazuddin Siddiqui | अचूक टाइमिंग, दिलखेच स्टाईल, आणि जबरदस्त डायलॉगबाजीमुळे फार कमी वेळात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच ‘नवाजुद्दीन सिद्दिकी’. नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी आत्तापर्यंत सिनेसृष्टी चांगलीच गाजवली. त्यांच्या बिनधास्त स्टाईलबाजीमुळे फार कमी वेळात त्यांचे लाखो चहाते मंडळी झाले आहेत.
त्याचबरोबर नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान नवाजुद्दीन सिद्दिकी यांना काही कलाकारांविषयी हॅशटॅग सांगण्यासाठीचे प्रश्न विचारले गेले. यामध्ये त्यांना अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींविषयी विचारल्यावर या अभिनेत्रींना ओळखत नसल्याचा अथवा त्यांचं काहीच काम पाहिलं नसल्याचा दावा नवाजुद्दीन यांनी केला आहे. इंटरव्यू दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.
इंटरव्यू दरम्यान काय म्हणाले नवाजुद्दीन?
नवाजुद्दीन सिद्दिकी एका वाहिनीला मुलाखत देत होते. मुलाखतीमध्ये त्यांना अनेक अनेक प्रश्न विचारण्यात आले. मुलाखतीला रंगत चढताना त्यांना बॉलीवूडमधील काही कलाकारांना हॅशटॅग द्यायला सांगितले. सलमान खानपासून ते आलिया भट्टपर्यंत सर्वांविषयी नवाजुद्दीन यांनी चांगलं वक्तव्य केलं. परंतु दीपिका पादुकोण आणि श्रद्धा कपूर या दोघींविषयी विचारण्यात आल्यावर त्यांनी त्यांचं फिल्म इंडस्ट्रीमधील काम माहित नसल्याचा दावा केलं आहे आणि त्यांच्याविषयी बोलायचं टाळलं आहे.
View this post on Instagram
दीपिका पादुकोण विषयी विचारण्यात आल्यावर
दीपिका पादुकोण विषयी विचारण्यात आल्यावर त्यांनी सरळ शब्दात सांगितलं की,” मी त्यांचं कोणतच काम पाहिलं नाही त्यामुळे मला माहिती नाही”. त्यानंतर श्रद्धा कपूरविषयी विचारण्यात आल्यावर नवाजुद्दीन म्हणाले की,”मला श्रद्धा कपूरविषयी काहीही माहित नाही”. त्यानंतर त्यांना श्रद्धाच्या ‘स्त्री’ चित्रपटाविषयी विचारण्यात आलं. तेव्हा सुद्धा ते म्हणाले,” चित्रपट पाहिला नाही पण लवकरच पाहीन”. अखेर नवाजुद्दीन यांनी दीपिका आणि श्रद्धाविषयी असं वक्तव्य का केलं असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.
दीपिका आणि श्रद्धा कपूर
दीपिका आणि श्रद्धा कपूर या दोघींनीही सिनेसृष्टीला अनेक प्रकारचे उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. त्याचबरोबर रुपेरी पडद्यावर पदार्पण करताना दीपिकाने किंग खानबरोबर काम करायला मिळतंय म्हणून स्वतःच्या मानधनावर पाणी सोडलं होतं. दीपिकाची ही गोष्ट अजूनही कोणी विसरलेलं नाही. त्याचबरोबर श्रद्धाने देखील अनेक चित्रपट गाजवले आहेत. तिच्या ‘हसीना पारकर’ या चित्रपटातील दमदार भूमिकेने सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. दरम्यान श्रद्धाचा ‘स्त्री टू’ हा चित्रपट देखील प्रचंड गाजला. तरीसुद्धा नवाजुद्दीन यांनी दोन्ही अभिनेत्रींविषयी अशी वक्तव्य का बरं केली असतील? हा प्रश्न अजूनही विचार करायला भाग पाडतोय.
Latest Marathi News | Nawazuddin Siddiqui On Deepika Padukone and Shraddha Kapoor 17 September 2024 Marathi News.
