15 December 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Punha Ekda Sade Made Teen | कल्ला करायला येतोय 'पुन्हा एकदा साडे माडे तीन', सिद्धूची पोस्ट पाहिलीत का - Marathi News

Highlights:

  • Punha Ekda Sade Made Teen
  • अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील या चित्रपटामध्ये
  • चित्रपटात दिसणार सैराट फेम कलाकार?
  • फोटो पोस्ट करत अभिनेत्याने लिहिलय हे कॅप्शन
Punha Ekda Sade Made Teen

Punha Ekda Sade Made Teen | अभिनेता ‘अंकुश चौधरी’ आणि ‘सचिन पाटील’ दिग्दर्शित 2006 सालचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा चित्रपट म्हणजे ‘साडे माडे तीन’. या चित्रपटाची क्रेज अजूनही तरुणांमध्ये पाहायला मिळते. कॉमेडी स्टार अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या त्रीकुटाने त्याकाळी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अमृता खाणविलकर देखील पाहायला मिळाली. तिची आणि भरतची भन्नाट लव्ह केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फारच छान वाटायचं.

अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील या चित्रपटामध्ये
दरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील या चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. या चित्रपटाबद्दल अभिनेत्याने एक मोठी अपडेट सर्वांना दिली आहे. त्याच्या पोस्टकडे अनेकांचे लक्ष वळाले आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता अंकुश चौधरी पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये हशा पिकवायला सज्ज झाल्याचा पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाचा मुहूर्त पार पडलेला दिसतोय. या चित्रपटामध्ये नेमके कोणकोणते कलाकार झळकणार आहेत पाहूया.

चित्रपटात दिसणार सैराट फेम कलाकार?
अभिनेता सिद्धार्थ जाधव याने चित्रपटाच्या शुभ मुहूर्ताची सुरुवात होतानाचे काही फोटोज त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. यामध्ये आपलं कॉमेडी त्रिकूट म्हणजेच भरत जाधव, अशोक सराफ आणि मकरंद अनासपुरे हे तर असणारच आहेत. सोबतच सैराट फेम अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू’ आणि ‘संकेत पाठक’ हे दोघं सुद्धा या चित्रपटाचा भाग बनणार असल्याचं पाहायला मिळतंय. सिद्धार्थ, रिंकू, संजय जाधव, अंकुश चौधरी आणि संकेत पाठक या कलाकारांचा एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर चांगला वायरल होताना दिसतोय.

दरम्यान रतन, चंदन आणि मदन हे तीन कुरळ्या केसांचे भाऊ 18 वर्षे उलटून गेली तरीसुद्धा अगदी तरुण आणि हँडसम दिसतायत. या तिघांचा निळ्या आणि पिवळ्या डंगरीमधील फोटो पाहून ‘साडे माडे तीन’ हा जुना चित्रपट डोळ्यांसमोर येऊन उभा राहतोय. या चित्रपटाबद्दल आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

फोटो पोस्ट करत अभिनेत्याने लिहिलय हे कॅप्शन :
आपल्या सिद्धूने चित्रपटाविषयी घोषणा करत भलं मोठं कॅप्शन लिहिलं आहे. यामध्ये तो लिहितोय की,”पुन्हा एकदा साडे माडे 3″ “पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या “MEGA SUPERSTARS” बरोबर काम करण्याचा योग..” असं लिहिल्यानंतर त्याने प्रत्येक कलाकाराचं नाव लिहत कॅप्शन लिहिलं आहे. त्याचबरोबर कॅप्शनच्या शेवटी त्याने असं लिहिलं की,”पुन्हा एकदा” मायबाप रसिकांना आनंद देण्याचा घेतलेला वसा.. सुपर हैप्पी अँड एक्साईटेड”. असं पुन्हा एकदाची सुरुवात करून सिद्धार्थने चित्रपटाची घोषणा केली आहे.

Latest Marathi News | Punha Ekda Sade Made Teen Movie 17 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Punha Ekda Sade Made Teen(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x