Phone Bhoot Trailer Out | 'फोन भूत' चित्रपटाचा ट्रेलर झाला आऊट, हॉरर चित्रपटामध्ये कॉमेडीचीही भर

Phone Bhoot Trailer Out | बॉलिवूडमधील सुपरस्टार कलाकार कतरिना कैफ चाहत्यांसाठी तिचा आगामी चित्रपट घेऊन येत आहे. 2021 मध्ये कतरिना सूर्यवंशी चित्रपटामध्ये दिसून आली होती त्यानंतर ती आता ‘फोन भूत’ चित्रपटामध्ये दिसून येणार आहेत. कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या हॉरर कॉमेडी सिनेमा ‘फोन भूत’चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना प्रचंड आवडणाऱ्या या हॉरर सिनेमात कॉमेडीचीही भर पडली आहे. ट्रेलरमध्ये पहिल्यांदाच कतरिना भूताच्या भूमिकेत दिसली होती. आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर कतरिनाने ‘फोन भूत’चा ट्रेलर पाहिल्यानंतर तिचा पती विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया कशी होती हे सांगितलं आहे.
‘फोनबूथ’चा ट्रेलर आऊट
ट्रेलर इव्हेंटदरम्यान कतरिना कैफने तिचा पती विकी कौशलची प्रतिक्रिया सांगितली आणि ‘फोन भूत’चा ट्रेलर आपल्याला आवडला असल्याचं सांगितलं. रिपोर्टनुसार कॅट म्हणाली, “विकीला ट्रेलर मजेशीर वाटला. त्याने ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यामुळे आम्हाला आणखी धैर्य आणि आनंद मिळतो.
कॅटला प्रियंका चोप्राला घाबरवायचे आहे.
रिपोर्टनुसार, कॅटने या इव्हेंटमध्ये खुलासाही केला की, ती कधीही हॉरर चित्रपट पाहत नाही कारण तिला भुतांची खूप भीती वाटते. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये भूत म्हणून कोणाला घाबरवायला आवडेल असं तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने देसी गर्ल प्रियांका चोप्राचं नाव घेतलं आणि म्हणाली की, मला प्रियांका चोप्राला घाबरवायचं आहे कारण मला खरंच तिच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की, ती इतकं काम कसं करते.
हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे,
‘फोन भूत’चे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. जसविंदर सिंग बाथ यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती रविशंकरन, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने केली आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सध्या चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Phone Bhoot Movie Trailer Out Checks details 11 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल