29 April 2024 2:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Electronic Mart IPO | शेअरची किंमत 56-59 रुपये प्रति शेअर, स्टॉक लवकरच बाजारात लिस्ट होणार, तारीख आणि अर्जाची स्थिती तपासा

Electronic Mart IPO

Electronics Mart India IPO| प्रसिद्ध रिटेल चेन इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा IPO शेअर बाजारात आला होता, आणि गुंतवणूकदारांकडून त्याला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. IPO इश्यूच्या शेवटच्या दिवशी या Electronics Mart India IPO ला 71.93 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते. या IPO मध्ये ज्या लोकांनी अर्ज केला होता, त्यातील काही पात्र यशस्वी गुंतवणूकदाराना 12 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल. शुक्रवारपर्यंत गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स येतील. 17 ऑक्टोबर 2022 रोजी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा शेअर्स स्टॉक मार्केट मध्ये सूचीबद्ध केला जाईल. या IPO चा आकार 500 कोटी रुपये आहे. IPO मध्ये शेअरची किंमत 56-59 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आली होती. या कंपनीच्या IPO लिस्टिंग बद्दल शेअर बाजारात आणि गुंतवणूकदारांमध्ये एकूणच सकारात्मक आणि उत्साहाची भावना दिसून येत आहे.

ग्रे मार्केटमधील प्रदर्शन :
ग्रे मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मार्ट IPO ची शानदार क्रेझ पाहायला मिळाली. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा शेअर 30 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 59 रुपयांच्या प्रीमियम प्राइस बँडमध्ये 50 टक्के अधिक किमतीवर ट्रेड करत आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की, या स्टॉकची IPO लिस्टिंग धमाकेदार होऊ शकते. 30 रुपयांच्या प्रीमियम किमतीनुसार हा शेअर 89 रुपये किमती सूचीबद्ध होऊ शकतो. आनंद राठी फर्म, IIFL सिक्युरिटीज आणि JM फायनान्शियल यांना या IPO इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

गुंतवणूकदारांचा प्रतिसाद :
Electronics Mart India चा IPO 500 कोटी रुपये चा आहे. आणि याला आतापर्यंत गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत या IPO ला 26,500 कोटींहून अधिक किमतीची बोली लागली आहे. हा IPO एकूणच 71.93 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. 2022 मध्ये सर्वाधिक बोली मिळालेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा IPO आहे. हर्षा इंजिनिअर्सच्या IPO ला सर्वात जास्त बोली प्राप्त झाली होती,ज्याचे 74.70 पट अधिक सबस्क्रिप्शन झाले होते. Electronics Mart IPO ला QIB/पात्र संस्थात्मक गुंतवणूकदाराकडून 169.54 पट अधिक बोली मिळाली आहे. NII/गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्या कडून 63.59 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे, आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून 19.72 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे.

IPO मध्ये अलॉटमेंट तपासण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा : 

पर्याय 1:
* BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन शेअर वाटप स्थिती तपासा.
* लिंक : bseindia.cominvestorsappli_check.aspx
* इक्विटी बॉक्स तपासावा आणि ड्रॉपडाउनमध्ये Electronics Mart या कंपनीचे नाव टाका.
* तुमचा अर्ज क्रमांक टाईप करा.
* तुमचा पॅन क्रमांक भरा.
* शेवटी, आपल्याला सर्च बटणावर क्लिक करा,पुढे संपूर्ण माहिती उघड होईल.

पर्याय २:
*IPO मध्ये शेअरचे वाटप तपासण्यासाठी साठी IPO रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर भेट द्या.
* लिंक : linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html
* ड्रॉपडाउनमध्ये, कंपनीचे नाव Electronics Mart असे टाका.
* बॉक्समध्ये पॅन क्रमांक, अर्ज क्रमांक किंवा डिपॉझिटरी/क्लायंट आयडी टाका.
* कॅप्चा नीट भरा, आणि सर्च बटणवर क्लिक करा. मग तुम्हाला शेअर वाटप झाला आहे की नाही, याची सर्व माहिती उपलब्ध होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Electronic Mart IPO is ready to Get listed on stock market in premium price 11 October 2022.

हॅशटॅग्स

Electronic Mart IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x