26 April 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

PS-1 Box Office Report | पोन्नीयिन सेल्वन-1 चित्रपटाने मोडला KGF 2 आणि RRR चा रेकॉर्ड, वाचा कमाईचा आकडा

PS-1 Box Office report

PS-1 Box Office report | सध्या प्रेक्षकांचा कल हा तमिळ चित्रपटांकडे वळत आहे, आणि तमिळ पट्ट्यातून प्रेक्षकांना देखील उत्तम चित्रपट पहायला मिळत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हिंदी पट्ट्यातील चित्रपट बॉयकॉटच्या ट्रेंड मधून जात आहेत. ऐश्वर्या राय बच्चनचा ‘पोन्नियिन सेल्वन-1’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे. दरम्यान, हा चित्रपट युद्धावर अवलंबून असून त्यात ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, कार्ती, प्रकाश राज आणि त्रिशा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मणिरत्नम यांनी चोल साम्राज्याची ही कहाणी पडद्यावर आणली आहे, ज्याचा प्रभाव बॉक्स ऑफिसवरही स्पष्टपणे दिसून येत आहे.

तीन दिवसांत चित्रपटाने विक्रम मोडला

‘पोन्नीयिन सेल्वन-1’ने अवघ्या तीन दिवसांमध्ये बक्कळ कमाई करत बॉक्स ऑफिसवर विक्रम नोंदवला आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्येच 100 कोटींचा व्यवसाय केला, याशिवाय जर विदेशी बाजाराबद्दल बोलायचे झाले तर यूएसए, यूके आणि ऑस्ट्रेलियामध्येही या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. अवघ्या 3 दिवसांत ‘पोनियिन सेल्वन-1’ ने जगभरात 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तसेच या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडला जवळपास 129 कोटींची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे ओव्हरसीज ग्रॉस कलेक्शन 96 कोटींच्या आसपास सांगितले जात आहे आणि अशा स्थितीत PS-1 चे आतापर्यंतचे एकूण संकलन 225 कोटी रुपये झाले आहे.

या चित्रपटांना मागे टाकून विक्रम केले
Ponniyin Selvan-1 ने UK मध्ये पहिल्या वीकेंडमध्ये 743 हजार पौंडांचा व्यवसाय केला आहे. अशा परिस्थितीत, ऐश्वर्याच्या चित्रपटाने एसएस राजामौलीचा चित्रपट RRR (RRR) किंवा यशचा चित्रपट ‘KGF Chapter 2’ (KGF 2) ची जागा घेतली आहे. बरं, ज्या वेगाने ‘पोनीयिन सेल्वन 1’ ला चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यावरून हा मणिरत्नमचा चित्रपट लवकरच त्याची किंमत काढून नफ्याच्या दिशेने वाटचाल करेल असं दिसून येत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PS-1 Box Office report Checks details 05 October 2022.

हॅशटॅग्स

PS-1 Box Office report(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x