30 April 2025 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

बिग बी मनाचा मोठेपणा दाखवा | अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर मनसेची पोस्टरबाजी... काय कारण?

Raj Thackeray

मुंबई, १५ जुलै | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जूहू येथील प्रतिक्षा बंगल्यासमोर काही पोस्टर लागले आहेत. विशेष म्हणजे हे पोस्टर त्यांच्या एखाद्या चित्रपटाचे नसून राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाकडून लावण्यात आले आहेत. झाले असे की, बृहन्मुंबई महानगरपालिका जवळपास एका आठवड्यापासून अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याची एक भिंत पाडण्याची तयारी करत आहे. अमिताभ बच्चन यांचा बंगला संत ज्ञानेश्वर मार्गावर आहे आणि बीएमसीला हा रस्ता रुंद करायचा आहे, यामुळे अमिताभ यांच्या बंगल्याची भिंत पाडावी लागणार आहे.

यासाठी मनसेने अमिताभ बच्चन यांना उद्देशून ‘बिग बी शो बिग हार्ट’ म्हणजे बिग बी मनाचा मोठेपणा दाखवा या मथळ्याचे पोस्टर त्यांच्या घराच्या बाहेर लावले आहेत. बुधवारी रात्री हे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा. हिच प्रतिक्षा. संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यास मुंबई महानगर पालिकेला आणि जनतेला सहकार्य करावे,’ असे या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे. मनसेचे माजी नगरसेवक मनिष धुरी यांच्या नेतृत्वात हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?
अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर दररोज वाहतुक कोंडी होते. या कारणामुळे बीएमसीला अमिताभ यांच्या बंगल्याशेजारील रस्ता 60 फूट रुंद करायचा आहे, सध्या या रस्त्याची रुंदी 45 फूट आहे. यापूर्वी 2017 मध्ये बीएमसीने अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठविली होती, परंतु बिग बींनी अद्याप या नोटीसला उत्तर दिलेले नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Raj Thackeray’s MNS party hold up a poster near to Amitabh Bachchan’s Pratiksha bungalow to Support BMC road news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या