14 November 2019 12:08 AM
अँप डाउनलोड

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होत. मागील अनेक दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते.

मोरुची मावशी या नाटकात त्यांनी निभावलेली मोरूच्या मावशीची भूमिका मराठी माणसाच्या घरा घरात पोहोचली होती. त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी कलाकाराची भूमिका ताकदीने पेलेल्या होत्या आणि एक विनोदी कलाकार म्हणूनच ते महाराष्ट्राला परिचित होते.

त्याच्या या संपूर्ण जीवनप्रवासात त्यांनी चारशेहून अधिक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये मोरुची मावशी आणि श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहेत. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होता आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलं होत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या