9 July 2020 10:03 AM
अँप डाउनलोड

काय उखडायची ती उखडा! शरद पवारांचे अमित शहांना आक्रमक उत्तर

BJP, NCP, amit shah, narendra modi, sharad pawar, ajit pawar, supriya sule, baramati

बारामती येथील सभेत शरद पवार म्हणाले, मला पद्मविभूषण देणारे, माझं बोट धरून राजकारणात आलोय असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांनी काय केले म्हणून विचारतात हे हस्यास्पद आहे. हे सरकार सैन्याच्या शौर्याचे श्रेय स्वत: घेत आहेत. अभिनंदनची सुटका माझ्यामुळे झाली असं सांगत पंतप्रधान मोदी ५६ इंचाची छाती दाखवतात पण मग आपला कुलभूषण जाधव कित्येक वर्ष पाकिस्तानात का आहे. त्याला सोडवताना मात्र याच पंतप्रधानांची छाती एकदम १२ इंचाची कशी काय होते?

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

अमित शहांच्या बारामती मधील सभेत त्यांनी मी इथे शरद पवार आणि राष्ट्रवादीला उखडायला आलोय असे विधान केले होते. याच विधानाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले “आता हा माझी काय उखडणार कुणाला माहिती”, बरं “काय उखडायचीय ती उखडा”. उगीचच उंटाचा कुठलाही मुका घ्यायला जाऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा समाचार घेतला.

बारामतीत येऊन अमित शहा यांना विकास दिसत नसेल तर त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करावे लागेल, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. बेटी बचाव ही मोहीम शरद पवारांची नसून ती माझी मोहीम आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा अभ्यास नेहमीप्रमाणे कमीच पडतो. त्यांनी अजित पवारांची शिकवणी लावली पाहिजे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x