27 July 2024 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण: राष्ट्रवादीचा आरोप

Devendra Fadanvis, Vinod Tawade, NCP, Dhananjay Mundey

मुंबई : खाजगी कोचिंग क्लासेसचे मालक आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असून देखील तो मंत्रालयात केवळ धूळखात पडून असल्याचा थेट आरोप एनसीपीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला आहे. तसेस याकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी देखील अनिल देशमुख यांनी केली.

गुजरात येथील सुरतमधील कोचिंग क्लासेसमध्ये भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये तब्बल २० ते २२ लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे देशात खळबळ उडाली. महाराष्ट्रात तब्बल १ लाख १० हजाराच्यावर खाजगी कोचिंग क्लासेस आहेत. त्यामध्ये मुंबईत ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस आहेत, ज्यांचे फायर ऑडिट देखील होत नाही. तसेच अचानक आग लागली तर आपत्कालीन समयी बाहेर पडायला देखील जागा नाही. विशेष म्हणजे या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही. कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत, असा गंभीर आरोपही अनिल देशमुख यांनी केला. सुरतसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घडू शकते. दुर्दैवाने अशी कोणती दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय राज्य शासनाकडे नाही असा आरोपही अनिल देशमुखांनी केला.

हॅशटॅग्स

#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x