26 July 2021 2:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

निवडणुकांना अजून ३ वर्ष शिल्लक | त्याआधीच युती, आघाडी, स्वबळाची भाषा करणं शहाणपणा नाही

NCP leader Praful Patel

मुंबई, १९ जून | मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फटकारले आहे. निवडणुकांना अजून अवकाश आहे. त्या आगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असा टोला लगावतानाच 2024’मध्ये मुख्यमंत्री कुणाचा असेल याचा फॉर्म्युलाही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. आगामी निवडणुकांना अजून ३ वर्ष बाकी आहेत. त्या आगोदरच युती, आघाडी, स्वबळाची भाषा करणं शहाणपणा नाही, असा टोला पटेल यांनी संजय राऊत आणि नाना पटोले यांना लगावला आहे. सामना वाचल्यावर काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील म्हणतात, निवडणुकांबाबतचा निर्णय 2003मध्ये होईल. त्यामुळे त्यावर आताच भाष्य करणं योग्य होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं

सध्या बहुमत महाविकास आघाडीकडे आहे आणि आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे आता जागा रिकामी नाही, असा चिमटाही त्यांनी नाना पटोले यांना काढला. दरम्यान, पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला सांगून आगामी काळात मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादीचाही दावा असणार असल्याचे संकेतच दिले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: NCP senior leader Praful Patel reaction on alliance in 2024 assembly elections news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x