26 March 2025 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, UPI आणि ATM वापरून 1 मिनिटात EPF खात्यातून 1 लाख रुपये काढता येणार Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या दरात मजबूत वाढ झाली, लग्नाच्या सीझनमध्ये तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, ताड तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IREDA TATA Motors Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने दिला खरेदीचा सल्ला, BUY रेटिंग सह टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ जीटीएल इन्फ्रा शेअर, महत्वाची अपडेट आली - NSE: GTLINFRA Trident Share Price | ट्रायडंट शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: TRIDENT GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरमध्ये घसरण, महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अनुमान जाणून घ्या - NSE: GTLINFRA
x

Fact Check | रिहानाच्या बदनामीसाठी तेच जुनं तंत्र उपसलं | पण हे आहे सत्य

Fake strategy, Singer Rihanna, BJP IT Cell

नवी दिल्ली, ०४ फेब्रुवारी: केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठिंबा मिळताना दिसत आहे. रकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाला मंगळवारी अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही पाठिंबा दिलाय. त्यामुळे सोशल मिडियावरील वातारवण ढवळून निघालं आहे. त्यानंतर त्यांच्या बदनामीसाठी सरकार समर्थक पुढे आले असून त्यांनी समाज माध्यमांवर खोटा प्रचार सुरु केला आहे.

राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यामुळे चर्चेत आलेली आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिच्यावर टीका होत आहे. भारतातल्या शेतकरी आंदोलनाचे तिनं समर्थन केलं. त्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी भारतातील अंतर्गत विषयांत नाक खुपसण्याची गरज नाही, असा सल्ला तिला दिला. पण, रिहाना आणि क्रिकेटचं फार जुनं नातं आहे.

वेस्ट इंडिज संघातील खेळाडू क्रेग ब्रेथवेट आणि कार्लोस ब्रेथवेट यांच्यासोबत रिहाना एकाच वर्गात शिकली आहे. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला चिअर करण्यासाठी रिहाना स्टेडियममध्ये पोहोचली होती. तेव्हा विंडीज संघानं तिच्यासोबतचे फोटोही काढले होते. मात्र याच फोटोचं फोटोशॉप एडिटिंग करून सध्या भाजप समर्थक तिची पाकिस्तान समर्थक असल्याच्या अफवा समाज माध्यमांवर पसरावताना दिसत आहे. त्यामुळे जो भाजप विरोधात बोलेल त्याला दहशतवादी, देशद्रोही किंवा पाकिस्तानी संबोधण्याचा प्रकार येथे देखील कायम असल्याचं दिसतंय.

 

News English Summary: The issue of agricultural laws enacted by the Center has now come under international discussion. Farmers, who have been protesting on Delhi’s borders for the past two and a half months, now see support from the international community. The agitating farmers have demanded that the government repeal these agricultural laws. The movement was also supported by American pop singer Rihanna on Tuesday. As a result, the atmosphere on social media has changed. Since then, government supporters have come forward to discredit him and launch false propaganda on social media.

News English Title: Fake strategy against singer Rihanna in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Fact Check(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या