25 June 2024 11:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 26 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell? RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
x

शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा कट | फेक व्हिडिओ शेअर करणारे अनेक भाजप समर्थक

Fake video, strategy, Farmers protest, Social media

नवी दिल्ली, १४ डिसेंबर: दिल्लीतील आंदोलक शेतकरी हे पाकिस्तान व चीन यांच्या मदतीने आंदोलन करीत आहेत. किंवा तिथे पाकिस्तान जिंदाबाद, खलिस्तान की जय, दहशतवाद्यांना सोडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील घोषणाबाजी सुरू असल्याचे दावे करणारे व्हिडिओ आणि फोटो सध्या जोरात शेअर केले जात आहेत. परंतु, असे व्हिडिओ आणि त्यावर आधारित फोटो खोटे असल्याचे ऑल्ट न्यूजने फॅक्टचेक मध्ये म्हटले आहे. Videos and photos claiming to have released terrorists and chanting slogans against Prime Minister Narendra Modi are currently being shared loudly.

ऑल्ट न्यूजनेकडून जगभरातील खोट्या बातम्या आणि राजकीयदृष्ट्या अफवा पसरवणाऱ्या फोटो व व्हिडिओ यांची खातरजमा करून बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. त्यांनी शेतकरी आंदोलनाशी जुने परदेशातील व्हिडिओ व फोटोज जोडून शेतकरी आंदोलनास बदनाम केले जात असल्याचे पुराव्यासह दाखवून दिले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये छेडछाड केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अमेरिका व युरोपातील जुने व्हिडिओ आताच्या शीख शेतकऱ्यांचे असल्याचे भासवून आंदोलनात फुट पडण्याचे निष्फळ प्रयत्न याद्वारे केले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. Alt News publishes news by confirming false news and politically rumored photos and videos from around the world.

‘किसान प्रदर्शनों के बीच तारिक फ़तह, ऑप इंडिया 2019 का देश विरोधी नारों का वीडियो सामने लाये’ या बातमीत ऑल्ट न्यूजने म्हटले आहे की, किमान एक वर्षांपूर्वी जुने असे व्हिडिओ आणि फोटो घेऊन तेच दिल्लीतील आंदोलनाचे असल्याचे दाखवले जात आहे. सध्या शेअर होत असलेले आणि बातम्यांमध्ये झळकत असलेले फोटो व व्हिडिओ हे 29 सप्टेंबर 2019 रोजीचे आहेत. ज्यावेळी पंतप्रधान मोदी अमेरिकेत होते. त्यावेळी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यासाठी आणि काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाचे दावे करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी न्युयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाहेर निदर्शने केली होती.

त्याच व्हिडिओच्या आधाराने पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थान येथील शेतकरी आंदोलकांना पाकिस्तानी, चीनी, खलिस्तानी आणि देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न होत आहेत. मुळात अनेकांनी बातम्या करून नंतर या बातम्या डिलीट केल्या आहेत. मात्र, आंदोलकांना बदनाम करण्याचा आणि फुट पडण्याचा डाव यानिमित्ताने यशस्वी झालेला आहे. दुर्दैवाने त्यामुळे शेतकरीच आता देशद्रोही म्हणून टीकेचे धनी ठरत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे व्हिडिओ आणि याच्या बोगस बातम्या जोरदार शेअर केल्या आहेत.

 

News English Summary: The agitating farmers in Delhi are agitating with the help of Pakistan and China. Or there are videos and photos claiming that Pakistan Zindabad, Khalistan Ki Jai, release the terrorists and sloganeering against Prime Minister Narendra Modi are currently being loudly shared. However, Alt News has stated in Factcheck that such videos and photos based on them are fake.

News English Title: Fake video strategy against farmers protest on social media news updates.

हॅशटॅग्स

#Fact Check(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x