14 December 2024 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

धनगर आरक्षण | रासपचं महत्व संपवून भाजपाकडे नैतृत्व घेण्याचा घाट? | पडळकरांना बूस्ट

BJP MLA Gopichand Padalkar, Dhangar reservation, Pravin Darekar

मुंबई, १४ डिसेंबर: हिवाळी अधिवेशानात धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन (BJP MLA Gopichand Padalkar on Dhangar Reservation) आणि ढोल वाजवत आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकरांना आपलं आंदोलन करु दिलं. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झालं तरी अद्याप धनगरांच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली नाही, विरोधात असताना महाविकास आघाडीचे नेते हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते, परंतु आता ते नेते गप्प का झाले? असा प्रश्न पडळकरांनी उपस्थित केला.

“धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत या सरकारने एकही बैठक घेतलेली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने एक हजार कोटींपैकी पाचशे कोटींची तरतूद केली होती. त्यातला एक रुपयाही धनगर समाजाला या सरकारने दिलेला नाही. विरोधक असताना हीच लोक नागपुरात डोक्याला पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडं, हातात काठी घेऊन आंदोलन करताना दिसली. आता सत्तेत असताना हे धनगरांचा तिरस्कार करत आहेत,” असा आरोप पडळकरांनी केला.

दरम्यान, सध्या धनगर समाजाचे नेते आणि रासपचे अध्यक्ष महादेव जाणकर (Dhangar Community Leader Mahadev Jankar) यांच्याकडील धनगर समाजाच्या प्रतिनिधीची धुरा भाजपने स्वतःकडे घेण्याची रणनीती आखल्याचं वृत्त आहे. त्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना पुढे करण्याची भाजपच्या नेत्याची रणनीती आहे असं समजलं. भारतीय जनता पक्ष रासप आणि त्यासोबत महादेव जानकर यांना बाजूला सारण्याचा तयारीत असल्याचं समजतं. त्यामुळे पुढे महादेव जानकर नेमका कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे. महादेव जानकर हे पंकज मुंडे समर्थक मानले जातात. त्यात ओबीसी नेत्या म्हणून परिचित असलेल्या पंकजा मुंडे यांनी बाजूला ठेवून भाजपच्या राज्यातील इतर वरिष्ठ नेत्यांनी ओबीसी संबंधित विषयांवर देखील मोर्चा वळवल्याचं दिसतंय.

 

News English Summary: In the winter session, BJP MLA Gopichand Padalkar dressed in a special Dhangari dress and played drums to draw the government’s attention to the issues of the Dhangar community. At that time, the police tried to stop them. But Praveen Darekar, Prasad Lad and Sadabhau Khot stopped the police and allowed the Padalkars to carry out their agitation. At this time, Gopichand Padalkar has made serious allegations against the Mahavikas Aghadi government.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar over Dhangar reservation with other BJP leaders news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x